पणजी, 28 जुलै : पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारा धबधबा (Waterfall) पाहण्याचा आनंद काही औरच असतो आणि त्यातही अशा धब्याधब्याजळून जाणारी ट्रेन आणि अंगावर उडणारे पाण्याचे तुषार हा अनुभव शब्दात मांडता न येण्यासारखा आहे. पण हाच धबधबा जर ट्रेनवर धबाधबा कोसळला तर...
असाच धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. गोव्यातील दूधसागर धबधबा (Dudhsagar waterfalls) ट्रेनवर कोसळला आहे. ट्रेनला आपल्या कवेत घेणाऱ्या धबधब्याचं धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे (Train passing near Dudhsagar waterfall).
WATCH: A train passing through Doodhsagar waterfall in South Western Railway, halted due to heavy rainfall. @RailMinIndia pic.twitter.com/lrGbfPpYbd
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) July 28, 2021
दूधसागर परिसरात इतका पाऊस कोसळतो आहे की धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. या धबधब्याचं पाणी थेट ट्रेनवरच कोसळू लागलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर जणू या पाण्यात निम्मी ट्रेन गायब झाल्यासारखीच दिसते आहे. पावसामुळे धबधब्याला आलेलं हे रूप पाहिल्यानंतर या ठिकाणाहून जाणारी रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. ज्या ट्रेनवर दूधसागरचा वर्षाव झाला ती तिथंच थांबवण्यात आली आहे.
हे वाचा - अद्भुत! कोरोना सोडा इथं आली हरणांची लाट; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी सोडू नका
पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेला हा धबधबा, गोव्यातील मांडोवी नदीवर आहे. दूधसागर हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. त्याची उंची 310 मीटर तर रुंदी 30 मीटर आहे. याच धबधब्याजवळ असलेला व्हिडीओत दिसणारा हा मडगाव-बेळगाव रेल्वेमार्ग.
हे वाचा - बापरे बाप! कामगारांच्या डोळ्यांदेखत राक्षसी भूस्खलन, खाणीत दरड कोसळल्याचा Video
पावसाळ्यामध्ये या धबधब्याचं दृश्य विलोभनीय असतं. हा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. तो पाहण्यासाठी दूरहून पर्यटक येतात. अगदी फिल्ममध्येही हा धबधबा दिसून आला आहे. तुम्ही शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या चेन्नई एक्स्प्रेस फिल्ममधील धबधबा पाहिला असेल. तो हाच दूधसागर धबधबा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goa, Train, Viral, Viral videos, Water