दरम्यान, बिहारमधल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये (Congress) सुरू झालेलं भांडण थांबण्याचं नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी एका मुलाखतीत काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बलांवर हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सिब्बल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अशा वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरगे म्हणाले, सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे आणि नेत्यांमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष कमकूवत बनतो असंही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा नष्ट झाली तर आपण सगळेच संपून जाऊ असंही ते म्हणाले. या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला आहे. उगाच फुकाचे सल्ले देण्यापेक्षा अशा नेत्यांनी काँग्रेस सोडून जावं अशी टीका काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.Goa: Congress interim president Sonia Gandhi and her son and party leader Rahul Gandhi arrive in Panaji.
Doctors had earlier advised Sonia Gandhi to spend time in a less polluted place: Sources pic.twitter.com/zxThQR20mH — ANI (@ANI) November 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.