मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे एका मंत्र्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे एका मंत्र्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

गोवा सरकारमध्ये (Goa Government) एका कॅबिमेट मंत्र्यावर (Miniter) गोव्याचे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडनकर (Girish Chodankar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. संबंधित मंत्र्याने आपला पदाचा दुरुपयोग करुन एका महिलेचं लैंगिक शोषण केलं, असा खळबळजनक आरोप चोडनकर यांनी केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

पणजी, 30 नोव्हेंबर : गोवा सरकारमध्ये (Goa Government) एका कॅबिमेट मंत्र्यावर (Miniter) गोव्याचे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडनकर (Girish Chodankar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. संबंधित मंत्र्याने आपला पदाचा दुरुपयोग करुन एका महिलेचं लैंगिक शोषण केलं, असा खळबळजनक आरोप चोडनकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 15 दिवसांत संबंधित मंत्र्यावर कारवाई नाही केली तर आम्ही सोडणार नाही. कोणतीही दयावया दाखवार नाही, असा इशारा गिरीश चोडनकर यांनी दिला आहे. काँग्रेसच्या या आरोपांमुळे गोव्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे (Sadanand Tanavade) यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. कोणत्याही मंत्रीविरोधात असे लैंगिक शोषणाचे आरोप नाहीयत. आगामी विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election 2022) जवळ आल्याने काँग्रेस अशाप्रकारचे आरोप करत आहेत, असं तनवडे यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या गिरीश चोडनकरांचे नेमके आरोप काय?

गिरीश चोडनकर यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. "संबंधित मंत्र्याने महिलेचं लैंगिक शोषण कशाप्रकारे केले ते उघड व्हावं यासाठी 20 दिवसांपूर्वी काही जबाबार लोकांनी व्हिडीओ, ऑडिओ आणि व्हाट्सअॅप चॅट समोर आणले होते, असा दावा चोडनकर यांनी केला. "आम्ही अजूनही मंत्र्याच्या नावाचा खुलासा करत नाही आहोत. ती आमची नैतिक जबाबदारी आणि आमची सौजन्यता आहे. या प्रकरणात महिला आणि मंत्री असे दोघांचे दोन कुटुंब आहेत. त्यांचा या प्रकरणात काहीच दोष नाही. आम्ही सरकारला 15 दिवस देतो. त्यांनी संबंधित मंत्र्याकडून राजीनामा घ्यावा. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा 19 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येतच आहेत", असा इशारा चोडनकर यांनी दिला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! 'या' IT कंपन्यांवर आली संक्रांत; दर 5 पैकी 1 कर्मचारी देतोय राजीनामा

"मंत्र्याचे संबंधित व्हिडीओ आणि ऑडिओ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दाखवले गेले होते. पण त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. ते मंत्र्याची सुरक्षा करण्यात आणि पुरावा नष्ट करण्याचा कामात गुंतलेले आहेत. मंत्र्याने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करुन महिलेचं लैंगिक शोषण केलं आहे. याआधी आम्ही मंत्र्यांचे भ्रष्टाचार समोर आणले आहेत. पण आता या प्रकरणात माफी दिली जाऊ शकत नाही. संबंधित प्रकार गोव्याच्या जनतेपर्यंत पोहोचवताना मला अत्यंत वाईट वाटत आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचाही दुरुपयोग केलाय. आम्ही गप्प कसे बसू? मुख्यमंत्री अशा घटनेचं समर्थन कसं करु शकतात?", असे सवाल चोडनकर यांनी केले.

हेही वाचा : भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवासासाठी नवे नियम लागू होणार

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं उत्तर

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे यांनी प्रत्युत्तर दिलं. "मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत विचारलं की, कोणत्या मंत्र्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत का? पण अशाप्रकारची कोणतीही तक्रार आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे. जर कोणत्या महिलेचं लैंगिक शोषण झालंय तर तिने तक्रार केली पाहिजे. तुम्ही कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप कसे लावू शकता? हे चुकीचं आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री आहेत. आम्हाला नेमका कोणावर संशय घ्यायला पाहिजे? याबाबत मुख्यमंत्र्यांनाही काहीच माहित नाही. कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नाही. काँग्रेस नेत्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी मंत्र्याचं नाव घ्यावं", असं आव्हान तनवडे यांनी काँग्रेस नेत्यांना दिलं.

First published: