राहुलजी, मी जीवघेण्या आजाराशी लढतोय;भेटीचं राजकारण बंद करा! - पर्रिकर

राहुलजी, मी जीवघेण्या आजाराशी लढतोय;भेटीचं राजकारण बंद करा! - पर्रिकर

'तुम्ही जे खोटं वक्तव्य केलं आणि भेटीचं राजकारण केलं त्यामुळे मला तुमच्या भेटीविषयीच्या हेतुबद्दलच शंका निर्माण झालीय.'

  • Share this:

पणजी 30 जानेवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भेटीवरून राजकारणाने आता वेगळं वळण घेतलंय. आपल्या शुल्लक राजकीय फायद्यासाठी माझ्यासोबतच्या भेटीचा उपयोग करू नका असं पर्रिकर यांनी एक पत्र लिहून राहुल गांधी यांना सुनावलं आहे. राजकारणात काही चांगल्या प्रथा परंपरा आहे. त्याचं पालन करतच मी तुम्हाला भेट दिली त्याचा असा उपयोग होईल असं वाटलं नव्हतं असंही पर्रिकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

असं आहे मनोहर पर्रिकरांचं पत्र...

प्रिय राहुल गांधींजी,

29 जानेवारीला तुम्ही आधी  कुठलीही माहिती न देता माझी भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. अशा प्रसंगी भेटून एकमेकांची विचारपूस करणं आणि सदिच्छा व्यक्त करणं ही भारतीय राजकारणाची चांगली परंपरा आहे. मी ज्या त्वेषाने आजाराशी लढतोय अशा परिस्थतीत तुमची भेट मी सकारात्मकतेने घेतली होती.

मात्र या भेटीच्या माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्या वाचून मी अतिशय दु:खी झालोय. माझ्याशी झालेल्या भेटीनंतर तुम्ही जे वक्तव्य दिलं त्याने मला धक्का बसलाय. आपल्या फक्त पाच मिनिटांच्या भेटीत राफेल किंवा इतर कुठला विषय सुद्धा निघाला नाही.

या भेटीचा तुम्ही अतिशय शुल्लक राजकीय कारणासाठी उपयोग केला हे अतिशय क्लेशकारक आहे. राफेलची खरेदी आणि सर्व प्रक्रिया ही संरक्षण खात्याच्या गरजेनुसार आणि नियमांनुसारच झाली आहे. हे मी आधीही सांगतिलं आणि आताही सांगतो आहे.

मी सध्या जीवघेण्या आजाराशी लढतो आहे. मी ज्या संस्कारात वाढलो आणि प्रशिक्षण घेतलं त्यामुळे मला लढण्याची शक्ती मिळते. त्याच शक्तीमुळे मी गोव्याच्या जनतेशी सेवा करत आहे.

तुम्ही जे खोटं वक्तव्य केलं आणि भेटीचं राजकारण केलं त्यामुळे मला तुमच्या भेटीविषयीच्या हेतुबद्दलच शंका निर्माण झालीय. या प्रकाराने मी खूपच दु:खी आहे. मला आशा आहे की तुम्ही जे सत्य आहे ते स्पष्ट कराल. या भेटीचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे.

धन्यवाद...

मनोहर पर्रिकर

First published: January 30, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading