गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सिद्ध केलं 'बहुमत'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सिद्ध केलं 'बहुमत'

  • Share this:

पणजी, 20 मार्च : मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. काल मध्यरात्री गोव्याचे नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळा झाल्यानंतर आज सावंत यांना गोवा विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरं जावं लागलं. मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला देखील आहेत. एकूण 20 आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी 21 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा भाजपप्रणित सरकारने केला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि 3 अपक्षांचा पाठिंबा मिळवून हे सरकार स्थापन झालं आहे.

मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसुझा यांचं निधन झाल्यामुळे गोव्यातलं भाजपचं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यासोबतच सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या काँग्रेस आमदारांनी राजीनामेही दिले होते. काँग्रेसचे गोव्यामध्ये 14 आमदार आहेत. त्यामुळे आपणच राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसनं दावा केला होता. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावाही केला होता पण अखेर सरकार स्थापन झालं ते भाजपचंच.

कोण आहेत प्रमोद सावंत?

- पर्रिकरांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर प्रमोद सावंत यांचे नाव गोव्याच्या राजकारणात चर्चेत येत होते. फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल केल्यानंतर सावंत यांनीच त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

- प्रमोद सावंत उत्तर गोव्यातील सैनक्वलिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. एक आयुर्वेद चिकित्सक असलेल्या सावंत यांना पर्रिकरांचे निकटवर्तीय मानले जाते.

- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसने प्रमोद सावंत यांना विधानसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची नोटीस दिली होती. काँग्रेसने भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता.

वाचा अन्य बातम्या :

'देशानं एका कुटुंबामुळे मोठी किंमत चुकवली आहे', मोदींचा काँग्रेसवर 'ब्लॉग'हल्ला

PM KISAN योजनेचा 'या' राज्यांमध्ये एकाही शेतकऱ्याला फायदा नाही

'PM मोदी, जनतेला मूर्ख समजू नका', प्रियांका गांधींचा हल्लाबोल

VIDEO : नागपूरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक

First published: March 20, 2019, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading