S M L

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन

पर्रिकरांना स्वादुपींडाचा कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Updated On: Mar 18, 2019 07:19 AM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन

पणजी 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी निधन झाले. गेली काही महिने गोव्यातच निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 63 वर्षांचे होते. प्रकृती ठीक नसतानाही ते मुख्यमंत्री कार्यालयात कामकाज बघत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासही अडचण होत होती. शेवटी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून पर्रिकरांच्या निधनाची बातमी देत दु:ख व्यक्त केलं.

पर्रिकरांना स्वादुपींडाचा कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरुवातीला उपचार झाले. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर काही महिने उपचार झाले. नंतर पर्रिकरांना अमेरिकेतून सुट्टी देण्यात आली होती.



Loading...












अमेरिकेतल्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अशा परिस्थितही लढवय्या पर्रिकरांनी गोव्याचं कामकाज पाहिलं. एवढंच नाही तर काही आठवड्यांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्पही विधानसभेत त्यांनी सादर केला होता.

अतिशय प्रमाणिक, साधी राहणी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले पर्रिकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. 2014 च्या निवडणुका झाल्यानंतर मोदींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं होतं. मात्र गोव्याच्या निसर्गात रमणारे पर्रिकर दिल्लीत फारसे रमलेच नाहीत. त्यांनी गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

पर्रिकर आजारी असताना राज्यात अनेकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अशा अवस्थेत पर्रिकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधीपक्षांकडून होत राहिली. त्यावरून भाजपवर जोरदार टीकाही झाली होती. मात्र पर्रिकरांनी त्या आरोपांना कधीच उत्तर दिलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 08:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close