पणजीतून पर्रीकरांच्या मुलाच्या ऐवजी यांना दिली उमेदवारी!

पणजीतून पर्रीकरांच्या मुलाच्या ऐवजी यांना दिली उमेदवारी!

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

पणजी, 28 एप्रिल: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा होती. पण त्याऐवजी कुंकळ्येंकर यांनी पक्षाने संधी दिली आहे. कुंकळ्येंकर सोमवारी अर्ज दाखल करतील असे सूत्रांनी सांगितले.

पणजी विधानसभा मतदारसंघाचे पर्रीकर यांनी 24 वर्ष नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघातून कुंकळ्येंकर आणि उत्पल पर्रीकर यांचे नावे चर्चे होती. पक्षाच्या निवडणूक समितीकडे ही दोन नावे पाठवण्यात आली होती. पण समितीने कुंकळ्येंकर यांना संधी दिली आहे.

कोण आहेत कुंकळ्येंकर

पणजी मतदारसंघ हा पर्रीकरांचा असला तरी कुंकळ्येंकर यांनी येथून दोन वेळा विजय मिळवला आहे. पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर 2015मध्ये कुंकळ्येंकर यांनी पणजीमधून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या सुरेंद्र फुर्तादो यांचा पराभव केला होता. तर 2017च्या विधानसभा निवडणुकीत कुंकळ्येंकर यांनी युनायटेड गोवन्स पक्षाच्या बाबुश मोन्सेरात यांचा पराभव करत विजय मिळवला होता. पण त्यानंतर पर्रीकर पुन्हा गोव्यात आले होते. तेव्हा कुंकळ्येंकर यांनी राजीनामा देत पर्रीकरांसाठी जागा रिकामी केली होती.

VIDEO: जीव वाचवण्यासाठी त्याने क्रेनवरून उडी मारली पण...!

First published: April 28, 2019, 7:39 PM IST
Tags: goa

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading