गोवा मुख्यमंत्रिपदाचा पेच; भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या

गोवा मुख्यमंत्रिपदाचा पेच; भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या

गोव्यात भाजपसमोर मोठा राजकीय पेच उभा राहिला असून गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण? हे पाहावं लागणार आहे.

  • Share this:

पणजी, 18 मार्च : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता गोव्यात भाजपसमोर नवीन राजकीय पेच उभा राहिला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. पण, प्रमोद सावंत सध्या विधानसभा सभापती आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी निवड करताना सर्वप्रथम भाजपला सभापती नियुक्त करावा लागेल. त्यानंतर भाजपचं संख्याबळ देखील कमी होणार आहे. त्यामुळे प्रमोद सावंत खरंच मुख्यमंत्रिपदी बसणार का? याबाबतची चर्चा आता गोव्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवाय, दुसरीकडे  श्रीपाद नाईक हे खासदार आहेत. तसेच त्यांना पक्षातून देखील विरोध आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणातून भाजप कसा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये नितीन गडकरी यांच्या खेळीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय, 19 ही मॅजिक फिगर भाजप कशी गाठणार हे देखील पाहावं लागणार आहे.

 दिगंबर कामतांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पण कामत यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याने गोवा सरकार बहुमतात आहे, हे सिद्ध करण्यासााठी दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी ते दिल्लीवरून गोव्याकडे निघाले आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यावर माझा दिल्लीचा दौरा दोन दिवसांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे कोणालाही भेटण्याचा प्रश्नच येत नाही. मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही आणि मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, असं कामत यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यातील संख्याबळ

एकूण जागा : 40

सध्याचे संख्याबळ - 36

भाजप : 12

मगोप - 3

गोवा फॉरवर्ड - 3

अपक्ष - 3

काँग्रेस आघाडी

काँग्रेस : 14

राष्ट्रवादी काँग्रेस- 1

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

First published: March 18, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या