मोदी लाटेत गोव्यात भाजपला मोठा धक्का

मोदी लाटेत गोव्यात भाजपला मोठा धक्का

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर विधानसभेची ही जागा रिकामी झाली होती. त्याच जागेवर ही पोटनिवडणूक झाली.

  • Share this:

अनिल पाटील,पणजी 23 मे : गोव्या लोकसभेसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही निवडणुक झाली यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पणजी या मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात 1हजार 775 मतांनी विजयी झालेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळेकर यांचा पराभव केला. आत्तापर्यंत ही जागा पर्रिकरांनी एकहाती जिंकली होती. या ठिकाणी व्हीहीपॅटची पडताळणी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात निकालाची औपचारिक घोषणा आयोग करणार आहे.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. त्याच जागेवर ही पोटनिवडणूक झाली. राज्यातलं पर्रिकरांच स्थान आणि वलय पाहता हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. देशभर लोकसभेच्या निकालांमध्ये भाजपने आघाडी घेतली असताना गोव्यात भाजपला गड असलेल्या जागेवर भाजपला पराभवाची चव चाखावी लागली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे हे दिग्गज नेते पिछाडीवर

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत.

सर्वांचं लक्ष लागलेल्या भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तिथे प्रज्ञासिंग टाकूर

मध्य प्रदेशात काँग्रसचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ असलेल्या गुणामध्ये काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर आहे.

हरियाणातल्या सोनिपतमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुड्डा पिछाडीवर आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी हे पंजाबमधल्या आनंदपूर साहिबमधून पिछाडीवर आहे.

उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंग पिछाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading