उन्हाळ्याच्या सुटीच्या धामधुमीत गोवा विमानतळ 2 तास वाहतुकीसाठी बंद

उन्हाळ्याच्या सुटीच्या धामधुमीत गोवा विमानतळ 2 तास वाहतुकीसाठी बंद

गोव्याच्या एअरपोर्टवर एका लढाऊ विमानाच्या इंधनाच्या टाकीला आग लागल्यामुळे हे एअरपोर्ट काही काळ बंद ठेवावं लागलं.

  • Share this:

पणजी, 8 जून : गोव्यामध्ये उन्हाळ्याच्या सुटीसाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. या सगळ्या धामधुमीतच गोव्याचं विमानतळ दोन तासासाठी बंद ठेवावं लागलं. एका लढाऊ विमानाने उड्डाण करण्याच्या वेळी विमानाच्या इंधनाची टाकी खाली पडली. या इंधनाच्या टाकीला आग लागली. त्यामुळे काही वेळ गोव्याचं विमानतळ बंद ठेवावं लागलं.

या विमानतळावरचे कर्मचारी लवकरच ही वाहतूक सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय हवाई दलाचं मिग 29 - K या विमानाची टाकी खाली पडल्यामुळे हा अपघात झाला. वेळीच सुऱक्षेचे उपाय केल्यामुळे कोणतंही नुकसान झालं नाही.

गोव्याच्या विमानतळावर विमान वाहतूक सुरू करण्याचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत,असं नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

उन्हाळ्याच्या सुटीमुळे गोव्यात आलेल्या पर्यटकांना विमानांच्या उड्डाणासाठी काही काळ थांबावं लागलं. त्याचवेळी विमानांचं लँडिंगही थांबल्यामुळे पर्यटकांची गैरसोय झाली.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

=============================================================================================

VIDEO: केरळमध्ये पंतप्रधान मोदींची कमळाच्या फुलांनी तुला

First published: June 8, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading