#GoBackModi : पाकिस्तानने रचला मोठा कट, न्यूज 18 ने केला खुलासा

#GoBackModi : पाकिस्तानने रचला मोठा कट, न्यूज 18 ने केला खुलासा

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पाकिस्तानच्या डोळ्यात चांगलीच खुपते आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधून सोशल मीडियावर पंतप्रधानांना बदनाम करणारी मोहीम चालवण्यात येतेय.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची आज तामिळनाडूमध्ये भेट होते आहे. शी जिनपिंग आज चेन्नईला दाखल झाले आणि तिथून ते समुद्रकिनाऱ्यावरच्या महाबलीपुरमला गेले. याच महाबलीपुरममध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानही या भेटीवर नजर ठेवून आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांची भेट पाकिस्तानच्या डोळ्यात चांगलीच खुपते आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधून सोशल मीडियावर पंतप्रधानांना बदनाम करणारी मोहीम चालवण्यात येतेय.

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याच्या निमित्ताने ट्विटरवर 'गो बॅक मोदी' असा हॅशटॅग ट्रेन्ड होता. याबद्दलची गंभीर गोष्ट म्हणजे मोदींच्या विरोधात सुरू असलेल्या या सोशल मीडिया कॅम्पेनला पाकिस्तानने चांगलंच खतपाणी घातलं.

पाकिस्तानमधल्या काही वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ही ट्रेंड पसरवला जात होता. जेव्हा पंतप्रधान मोदी तामिळनाडूला जातात तेव्हातेव्हा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत असतो. यावेळी मात्र पाकिस्तानने हा ट्रेंड भारतद्वेष पसरवण्यासाठी वापरला. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कट असल्याचं बोललं जातंय.

 

===========================================================================================================

VIDEO : काय म्हणजे XXX समजलंय का? राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात

First published: October 11, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading