Home /News /national /

सर तुम्ही जिंकलंत! सोलापूरच्या शिक्षकाने बक्षिसाच्या 7 कोटींपैकी अर्धे पैसे केले दान, जिंकला होता Global Teacher पुरस्कार

सर तुम्ही जिंकलंत! सोलापूरच्या शिक्षकाने बक्षिसाच्या 7 कोटींपैकी अर्धे पैसे केले दान, जिंकला होता Global Teacher पुरस्कार

सोलापूरमधील दुष्काळी भागातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या विशेष कार्यामुळे त्यांना ग्लोबल टीचर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारातील 7 कोटी 38 लाख रुपयांतील अर्धी रक्कम त्यांनी या पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या उर्वरित 9 शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    सोलापूर, 4 डिसेंबर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीतील शाळेतील रणजितसिंह डिसले (Ranjit singh Disale ) शिक्षक हे तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करण्यासाठी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. शालेय पुस्तकांत क्यूआर कोडचा वापर करण्याच्या त्यांच्या प्रयोगाची जागितक स्तरावर दखल घेण्यात आली असून त्यासाठी डिसले गुरुजींची ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी (Global Teacher Prize) निवड करण्यात आली आहे. पुरस्कारातील 7 कोटी 38  लाख रुपयांतील अर्धी रक्कम त्यांनी या पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या उर्वरित 9 शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरमधील दुष्काळी भागातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या विशेष कार्यामुळे त्यांना ग्लोबल टीचर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनच्या वार्की फाउंडेशनने (warke foundation) 2014 मध्ये शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सुरु केला होता. 32 वर्षीय रणजितसिंह यांना 10 लाख डॉलर पुरस्काराची रक्कम म्हणून देखील मिळणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटी 38 लाख रुपये होते. यामधील अर्धी रक्कम त्यांनी या पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या उर्वरित 9 शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्काराची अर्धी रक्कम वाटल्यानंतर प्रत्येक रनरअपला 40 हजार पाउंड मिळणार आहेत. यावर्षी या पुरस्कारासाठी जगभरातून 12 हजार शिक्षकांची नावे आली होती. कोरोनाच्या(covid19) संकटकाळात सगळीकडे शाळा बंद होत्या. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. परंतु यामध्ये मुली मागे पडताना दिसून येत आहे. मुलींच्या हातात मोबाईल फार कमी येत असल्याने या डिजीटल शिक्षण पद्धतीचा त्यांना काही फायदा होत नाही. त्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी या काळात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. (वाचा - भारताला पहिल्यांदा मिळाला मान; सोलापूरातील ZP शाळेच्या शिक्षकाला 7 कोटींचा Global Teacher पुरस्कार जाहीर) 2009 मध्ये सोलापूरच्या (Solapur) परितेवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झाल्यानंतर शाळेची अवस्था फारच वाईट होती. शाळेची इमारत गोठा म्हणून वापरली जात होती. त्याचबरोबर स्थानिक नागरिक आपल्या मुलींना शाळेत शिकवण्यासाठीदेखील पाठवत नव्हते. रणजित डिसले गुरुजींनी हे बदलण्याचा निर्धार करत घरोघरी जात पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर यामध्ये असणारी प्रमुख समस्या म्हणजे इंग्रजी भाषेतील पुस्तके. त्यांनी सर्वात आधी ही पुस्तके मातृभाषेत म्हणजेच मराठीत भाषांतरित केली. यामध्ये त्यांनी तंत्रज्ञानाची देखील जोड दिली. त्यांनी पुस्तकांमध्ये क्यूआर कोड तंत्राचा वापर केला असून, विद्यार्थी व्हिडीओ लेक्चर देखील पाहू शकतात तसेच कविता आणि गोष्टीदेखील ऐकू शकतात. त्यांच्या या प्रयत्नामुळे आसपासच्या गावांमध्ये आणि त्यांच्या शाळेच्या गावामध्ये बालविवाहाच्या दरामध्ये मोठी घट झाली. (वाचा - 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म) महाराष्ट्रात क्यूआर कोडची सुविधा सर्वांत आधी रणजित यांनी सुरु केली. याचबरोबर 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी या पद्धतीने सर्व सिलॅबस जोडण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता सरकारने सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांमधे राज्य सरकार क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. एनसीईआरटीनेदेखील याची घोषणा केली आहे. (वाचा - भारतीय वंशाची गीतांजली राव Kid of the Year, 15 वर्षांच्या मुलीचा TIMEकडून सन्मान) क्यूआर कोडचा (QR Code) क्विक रिस्पॉन्स कोड हा फुलफॉर्म आहे. बारकोडच्या पुढील जनरेशनमधील हा कोड असून यामध्ये विविध माहिती सुरक्षित राहते. चौकोनी आकाराचा हा कोड असून आपल्या नावाप्रमाणेच फास्ट काम करण्याचे कार्य हा कोड करतो. पुस्तक असो किंवा वेबसाईट असो सर्व प्रकारची माहिती या क्यूआर कोडमध्ये समाविष्ट असते.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या