रेल्वेसाठी मोदी सरकारने घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय

रेल्वेसाठी मोदी सरकारने घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय

रेल्वेमध्ये अमुलाग्र परिवर्तन आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. पुढच्या सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 24 डिसेंबर : देशभर आता खासगी ट्रेन (Private Train) चालणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) हा मोठा निर्णय घेतला असून रेल्वेच्या इतिहासातला हा सर्वात मोठां निर्णय असल्याचं मानलं जातंय. देशात तब्बल 150 खासगी ट्रेन्स चालविण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. सूत्रांनी CNBC आवाजला दिलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवडाभरात 150 गाड्या खासगी तत्वांवर चालण्याविण्याची मंत्रालयाची योजना असून त्यासाठीही लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सध्या खासगी तत्वावर फक्त तेजस एक्सप्रेस (Tejas Express) चालवली जाते. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून ही गाडी चालवली जाते. या प्रक्रियेत 150 गाड्यांसाठी कंपन्यांनी बोली लावावी लागणार आहे. यात देशी आणि विदेशी कंपन्यांही सहभागी होऊ शकतात.

कंपन्यांना अधिकार मिळाल्यानंतर तिकीट आणि जेवणाचे दर ठरविण्याचे अधिकारही त्यांनाच मिळणार आहेत. रेल्वेमध्ये अमुलाग्र परिवर्तन आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. पुढच्या सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून 2021-2022मध्ये या ट्रेन्स चालविल्या जातील असं बोललं जातंय.

VIDEO धक्कादायक! थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर भर रस्त्यात हल्ला

भारताची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस सध्या कोकण रेल्वेवर चालवली जातेय. पहिल्यांदा ही ट्रेन लखनऊ आणि नवी दिल्लीच्या मध्ये चालवली गेली. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही ट्रेन आयआरसीटीसीला द्यायचा निर्णय घेतलाय. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा आहे. आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये आहेत.

CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, मराठी भाषेबद्दल उपस्थित केला मुद्दा

विमानाप्रमाणे या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर LCD स्क्रीन लावलेला आहे. प्रत्येक सीटवर अटेंडेंट बटण आहे. ते प्रेस करून तुम्ही सहाय्यकाला बोलवू शकता. या ट्रेनमध्ये LED लाइट लावलेत. सिगरेट स्मोकिंग डिटेक्ट करण्यासाठी ऑटो डिटेक्टर लावलेत. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय. प्रत्येक सीटवर चार्जिंग आणि युएसबी केबल लावलीय. ट्रेनला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC )कडे सोपवलं गेलंय. आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये असल्याने प्रवाशांच्या पसंतीस ही ट्रेन उतरली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या