Home /News /national /

अलर्ट! केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा भारताला धोका, समोर आला चिंता वाढवणारा रिपोर्ट

अलर्ट! केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा भारताला धोका, समोर आला चिंता वाढवणारा रिपोर्ट

नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावं वितळू लागली आहेत.

    लडाख, 10 नोव्हेंबर : लडाखमध्ये गोठलेले बर्फ जर वितळू लागले तर काय होईल याचा अंदाजही तुम्हाला बांधता येणार नाही. जर असे झाले तर उत्तर भारतात एक भयंकर नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावं वितळू लागली आहेत. लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. इथले तापमान अत्यंत कमी आहे. हिवाळ्याच्या काळात तापमान -16 पर्यंत असते. मात्र, वेगाने वाढणार्‍या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशिअर वितळत आहेत. त्याचप्रमाणे येथील बर्फाचे तलावही वितळत आहेत. तलावांमध्ये बर्फ वितळल्यास हिमालयीन प्रदेशात पूर येऊ शकतो. वाचा-पाकिस्तानातून 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, BSFने केला मोठा खुलासा दक्षिण आशिया संस्था आणि हेडलबर्ग सेंटर फॉर द एनव्हायरनमेंट ऑफ रुपर्टो कॅरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरातील विघटनावर संशोधन केले. यामुळे या परिसरात पूर आला होता. भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्कस न्युसरर म्हणाले की, लडाखच्या ग्लेशिअर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोंचा वापर केला गेला. नुसरेर यांनी सांगितले की, या हिमाच्छादित तलावांचा आणि ग्लेशिअरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सखल भाग भरून वाहू शकेल. भारताला केदारनाथमध्ये आलेल्या पूरात अशाची परिस्थिती आली होती. ग्लेशिअर फुटून कधीही पूर येऊ शकतो. म्हणूनच भारतासह सर्व आशियाई देशांनी ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. वाचा-बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी प्रोफेसर नुसरर यांनी सांगितले की भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. ग्लेशिअर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लड्स म्हणतात. हा अभ्यास नॅचरल हॅजर्ड्स नावाच्या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आहे. मुख्य म्हणजे केवळ भारताच्या लडाख भागातील ग्लेशिअरच वितळत नाही आहेत तर, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. प्रो. नुसररच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला. वाचा-नातवाला शिकवता शिकवता आजीचं नशीब फळफळलं; पुस्तकात मिळाला असा खजिना झाली कोट्यधीश ऑगस्ट 2014मध्ये लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 मीटर उंचीवर आहे. आता तुम्ही विचार करा जेव्हा पाण्याचा प्रवाह एवढा असेल तेव्हा किती नुकसान होईल. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधक ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्वांना देशांना करत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Ladakh

    पुढील बातम्या