• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ''नियमांचं पालन करा नाहीतर...'', केंद्र सरकारचा संताप; ट्विटरला झापलं

''नियमांचं पालन करा नाहीतर...'', केंद्र सरकारचा संताप; ट्विटरला झापलं

Twitter Vs Central Government: ट्विटरच्या प्रतापावर केंद्र सरकार चांगलंचं संतापलं आहे. रकारनं नव्या आयटी नियमांबद्दल ट्विटर (Twitter) ला शेवटचा इशारा दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 05 जून: आज ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती (M Venkaiah Naidu) व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक (Blue Tick) हटवली होती. ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं होतं. मात्र आता ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं आहे. दरम्यान ट्विटरच्या प्रतापावर केंद्र सरकार चांगलंचं संतापलं आहे. सरकारनं नव्या आयटी नियमांबद्दल ट्विटर (Twitter) ला शेवटचा इशारा दिला आहे. लवकरच भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करा, असं सरकारनं ट्विटरला म्हटलं आहे. जर कंपनी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करत नसेल तर परिणामासाठी तयार राहा, असंही सरकारनं ट्विटरला इशारा दिला आहे. NDTV नं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारनं ट्विटरला म्हटलं की, नियमांचं तातडीनं पालन करण्यासाठी (Twitter New IT Rules) सरकार ट्विटरला अंतिम नोटिस देत आहे. नियमांचं पालन न केल्यास आयटी कायदा 2000 च्या 79 कलमांतर्गत सूट रद्द होईल आणि ट्विटर आयटी कायदा आणि इतर कायद्यांनुसार दंड देण्यास पात्र ठरतील. यापूर्वीही सरकारने कंपनीला भारतीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अद्याप ट्विटर कंपनीनं माहितीसाठी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही आहे. हेही वाचा- ''...तर मग आमच्या काँग्रेसला शुभेच्छा'', संजय राऊतांचा काँग्रेसला टोला उपराष्ट्रपतींच्या अकाउंटची ब्लू टिक रिस्टोर आज सकाळी ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली होतं. (Twitter withdraws blue tick from personal handle of Venkaiah Naidu). ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं होतं. मात्र काही वेळापूर्वी ते पुन्हा ब्लू टिक रिस्टोर करण्यात आली आहे. हेही वाचा- अनलॉकच्या टप्प्यात मुंबई नेमकी कोणत्या स्तरात?, महापौरांनी केलं स्पष्ट उपराष्ट्रपती यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवर संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटनं हटवली (Twitter removed blue tick of senior RSS functionaries) आहे. त्यांची ब्लू टिक अद्याप रिस्टोर झाली नाही आहे. ट्विटरवरील ब्लू टिक ही एखादं अकाउंट मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं अधिकृत अकाउंट असल्याचं दर्शवत असते. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश असतो.
  Published by:Pooja Vichare
  First published: