मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना लस घेण्यास काँग्रेस नेते खर्गेंचा नकार, सांगितलं 'हे' मोठं कारण

कोरोना लस घेण्यास काँग्रेस नेते खर्गेंचा नकार, सांगितलं 'हे' मोठं कारण

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची (Corona Vaccine) मोहीम आजपासून सुरू झाली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मात्र लस घेण्यास नकार दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 1 मार्च : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची (Corona Vaccine) मोहीम आजपासून सुरू झाली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मात्र लस घेण्यास नकार दिला आहे. 'कोरोना लस कधी घेणार?' या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी याचं कारण सांगितलं.

काय म्हणाले खर्गे?

मल्लिकार्जुन खर्गेंनी ज्येष्ठ नागरिकांच्या ऐवजी तरुणांना आधी लस देण्याची मागणी केली आहे. ‘माझं वय आता 70 वर्ष आहे. कोरोना लस तरुणांना द्यायला हवी. त्यांच्याकडं मोठं आयुष्य आहे. माझ्याकडे तर आता 10 ते 15 वर्षच आयुष्य उरलंय.’ असं स्पष्टीकरण खर्गे यांनी दिलं आहे.

I am above 70 years of age. You should give it (#COVID19 vaccine) to youngsters who have a longevity in life as opposed to me. I merely have 10-15 more years to live: Mallikarjun Kharge, Leader of Opposition in Rajya Sabha, when asked if he would take the vaccine jab pic.twitter.com/n5ljqmInZt

— ANI (@ANI) March 1, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi vaccinated) यांनी पहिल्या दिवशी कोरना लस घेतली. नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी लस घेतली. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

( वाचा :  आसामचा गमछा, केरळ, पुदुच्चेरीच्या नर्स, पंतप्रधान मोदींच्या लशीचे इलेक्शन कनेक्शन )

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी देखील कोरोनाची लस टोचून घेतली.

"बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफस दिली जाईल. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देणार असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन सत्तारुढ आघाडीनं दिलं होतं. ते आश्वासन नितीश कुमार सरकार पूर्ण करणार आहे.

First published:

Tags: Congress, Corona vaccine