Pulwama : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर, इम्रानने मागितली 'ही' संधी

Pulwama : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर, इम्रानने मागितली 'ही' संधी

इम्रान खान यांनी आता भारताकडे शांततेसाठी एक संधी मागितली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 25 फेब्रुवारी : भारताला 'जशास तसे' उत्तर देण्याची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अखेर जमिनीवर आले आहेत. भारतानं शांततेची एक संधी द्यावी असं आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे. शिवाय, भारतानं ठोस पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करू असं देखील इम्रान खान यांनी म्हटलं आहे. टोंक येथे झालेल्या भाषणामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. शिवाय, इम्रान खान तुम्ही दिलेलं वचन कधी पाळणार? असा सवाल देखील नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी आता शांततेसाठी एक संधी मागत पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानला तसेच दहशतवाद्यांना इशारा देत याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे पावलं उचलण्याकरता भारतानं सुरूवात देखील केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं आता भारताकडे एक संधी मागितली आहे.

लष्कराच्या देखील उलट्या बोंबा

इम्रान खान यांच्या नंतर लष्करानं देखील पत्रकार परिषद घेत भारताला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पुलवामा हल्ल्याशी पकिस्तानचा काहीही संबंध नाही पाकिस्तानात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना पाकिस्तान का हल्ला करेल असा सवाल त्यांनी केला. भारतच काश्मीरमध्ये अत्याचार करत आहे असा कांगावाही केला. आम्हाला युद्ध नको आहे मात्र युद्ध झालच तर आम्ही प्रतिकार करू असा इशारा पकिस्तानचे लष्करी अधिकारी असिफ गफूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला होता.

भारताच्या टॉमेटोमुळे पाक मीडिया लालेलाल; रिपोर्टरचा 'तोबातोबा'वाला VIDEO व्हायरल

पाकिस्तानविरोधात भारताची कडक पावलं

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानच्या वस्तुंवर देखील भारतानं 200 टक्के आयात शुल्क लावले आहेत. तर, भारतानं पाकिस्तानविरोधात संयुक्त राष्ट्र संघात देखील आवाज उठवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकची नाकेबंदी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

काश्मीरमध्ये स्फोटक स्थिती, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

पाणी रोखण्याचा निर्णय

मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून 21 फेब्रुवारी रोजी याबद्दलची माहिती दिली होती.

VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला

First published: February 25, 2019, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading