Home /News /national /

प्रेयसीने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून केली प्रियकराची हत्या, काय आहे कारण?

प्रेयसीने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून केली प्रियकराची हत्या, काय आहे कारण?

राजस्थानच्या जैसलमेरमधून (Jaisalmer) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका प्रेयसीने तिच्या नातेवाईकांसोबत मिळून आपल्या प्रियकराचीच हत्या (Girlfriend killed boyfriend) केली आहे. त्यानंतर आत्महत्या (Suicide) केली आहे, असे दाखवण्याच्या उद्देशाने झाडाझुडपांत फेकून दिला.

पुढे वाचा ...
  जैसलमेर, 15 मे : राजस्थानच्या जैसलमेरमधून (Jaisalmer) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका प्रेयसीने तिच्या नातेवाईकांसोबत मिळून आपल्या प्रियकराचीच हत्या (Girlfriend killed boyfriend) केली आहे. त्यानंतर आत्महत्या (Suicide) केली आहे, असे दाखवण्याच्या उद्देशाने झाडाझुडपांत फेकून दिला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. दीनाराम भील (30) असे मृताचे नाव आहे. यानंतर चौकशीत आरोपींना आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या घटनेच्या खुलाशानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे घटना - पोलीस अधीक्षक कैलाश बिश्नोई यांनी सांगितले की, दीनाराम भील (वय 30) याची मृतदेह मोहनगडच्या शांत परिसरातील झाडाझुडपांमधून जप्त केला गेला. दीनाराम याची त्याची प्रेयसी धनी आणि तिच्या नातेवाईकांनी मिळून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह फेकून दिला. नाचना येथील रहिवासी दीनाराम भील चार दिवस आधी म्हणजे 10 मेला घरातून न सांगता निघून गेला होता. त्याच्या नातेवाईकांना त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यानंतर त्याच्या नातेवाईकांना पोलिसांत धाव घेत तो गायब झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी नाचना आणि मोहनगढसह परिसरातील आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच आले नाही. यानंतर पोलिसांनी दीनाराम याचे लोकेशन ट्रॅक केले. तर ते मोहनगडच्या जवळपास आढळले. याचदरम्यान, पोलिसांना माहित झाले की, दीनाराम त्याची प्रेयसी धनीच्या आसपास नेहमी येत जात होता. दीनारामचे धनीसोबत असलेली जवळीक तिच्या नातेवाईकांना आवडत नव्हती. यामुळे पोलिसांना धनीच्या नातेवाईकांवर संशय गेला. यानंतर पोलिसांनी दीनारामची प्रेयसी धनीला ताब्यात घेऊन चौकशी केली. हेही वाचा - 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं
  तसेच तिच्या वडीलांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. धनीच्या वडिलांनी सांगितले की, त्याने आपली पत्नी, मुलगा आणि धनीसोबत मिळून दीनारामची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह हमीर नाडा (मोहनगड) परिसरातील झाडाझुडपात फेकून दिल्याचे त्याने कबूल केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Boyfriend, Girlfriend, Murder news, Rajasthan

  पुढील बातम्या