एकत्र वेळ घालवण्यासाठी डेटिंगवर गेलं कपल, अज्ञातांनी प्रेयसीचं केलं अपहरण!

एकत्र वेळ घालवण्यासाठी डेटिंगवर गेलं कपल, अज्ञातांनी प्रेयसीचं केलं अपहरण!

प्रियकरासोबत डेटिंगवर गेलेल्या प्रेयसीचं अपहरण करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

झारखंड, 29 ऑगस्ट : सध्या डेटिंगचा जमाना आहे. हल्लीची तरुणाई नव्या ओळखी वाढवण्यासाठी डेटिंगला जाते आणि एकमेकांसोबत वेळ घालवते. पण अशात डेटिंगवर गेलेल्या प्रियकराच्या प्रेयसीचं अपहरण झालं तर...! हे वाचून धक्का बसला असेल तर हे सत्यात घडलं आहे. प्रियकरासोबत डेटिंगवर गेलेल्या प्रेयसीचं अपहरण करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात पालथा घातल्यानंतर प्रेयसीचा शोध लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरण कर्त्यांनी प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केली. त्यात प्रियकराला बेदम मारहाण करून त्याला पळून लावण्यात आलं आणि प्रेयसीला पळवून जंगलामध्ये घेऊन गेले. या सगळ्या प्रकाराची माहिती प्रियकराने पोलिसांत दिली आणि त्यानंतर प्रेयसीचा कसून शोध सुरू झाला.

बेदम मारहाण करून प्रियकराला पळवलं आणि प्रेयसीचं केलं अपहरण

पीडित प्रियकराने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे कारने डेटिंगवर गेले होते. प्रवासात असताना सोनारी दोमुहानी पुल पार केल्यानंतर सरायकेला जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेव्हा त्यांना 4-5 लोकांनी घेरलं. त्यांना गाडीच्या बाहेर खेचत त्यांची बेदम मारहाण केली. अज्ञातांनी प्रियकराला तिथून पळवून लावलं आणि प्रेयसीचं अपहरण केलं.

इतर बातम्या - धक्कादायक! मुलाने सुपारी देऊन केली आईची हत्या, दारूच्या नशेत ओकलं सत्य

पोलिसांनी दबाव टाकल्यानंतर मुलीची सुटका

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित प्रियकराने आपल्या मित्रांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याविरोधात तक्रार दाखल करून घेतल्यानंतर प्रेयसीचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी छापेमारी केली. अखेर अनेक प्रयत्नानंतर तरुणीचा शोध लागला. पोलिसांनी आरोपींवर दबाव टाकतं तरुणीची सुटका केली.

इतर बातम्या - हाय अलर्ट, समुद्रामार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत पाकिस्तानी 'कमांडो'

एसपी कार्तिक एस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. पोलिसांच्या दबावामुळे अपहरणकर्त्यांनी मुलीला सोडलं आणि तेथून पळ काढला.

तरुणीच्या भावाने तिच्या प्रियकरावर आणि मित्रांवर तिच्या अपहरणाचा आरोप केला आहे. तसंच सुरक्षेसाठी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading