राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारण्यास नकार, विद्यार्थिनीने केला निषेध

राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारण्यास नकार, विद्यार्थिनीने केला निषेध

पुद्दुचेरी विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या विद्यार्थीनीने राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला.

  • Share this:

चेन्नई, 24 डिसेंबर : पुद्दुचेरी विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या विद्यार्थीनीने राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला न गेल्याने तिने पदवी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रुबीहा अब्दुरहीम असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला याआधी तिने विरोध दर्शवला होता.

रुबीहाने सोशल मीडियावर नागरिकत्व कायद्याविरोधात अनेकदा मत व्यक्त केलं आहे. पदवीदान समारंभाला आल्यानंतर रुबीहाला विशेष पोलीस अधिक्षकांनी बाहेर बोलावून नेलं. पुन्हा प्रवेश न देता बाहेरच उभा करण्यात आल्याचं रबीहाने म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण आपल्याला हॉलच्या बाहेर उभा राहून ऐकावं लागलं. मला बाहेर का काढलं याबद्दल काहीच कल्पना नसून असं का केलं? असा सवालही रुबीहाने विचारला आहे. नागरिकत्व कायद्याला केलेला विरोध, आंदोलनात भाग घेतल्यानं अशी वागणूक दिल्याची शक्यता असल्याचं मत रुबीहाने व्यक्त केलं.

पदवीदान समारंभात राष्ट्रपतींचे भाषण संपल्यानंतर रुबीहाला हॉलमध्ये प्रवेश दिला गेला. रुबीहाने यावेळी प्रमाणपत्र स्वीकारले पण निषेध व्यक्त करत राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारायला नकार दिला. हॉलबाहेर काढणं हा आमचा अपमान असल्याचं रुबीहा म्हणाली.

CAA : आंदोलन करणाऱ्या जर्मन विद्यार्थ्याला दणका, सोडायला लावला भारत

Published by: Manoj Khandekar
First published: December 24, 2019, 3:23 PM IST
Tags: india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading