Home /News /national /

अजगरासाठी रोखलं पूर्ण ट्रॅफिक, तरुणीचं होतंय जोरदार कौतुक

अजगरासाठी रोखलं पूर्ण ट्रॅफिक, तरुणीचं होतंय जोरदार कौतुक

रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात असणारं अजगर तिला दिसलं आणि तिनं ट्रॅफिक थांबवण्याचा निर्णय घेतला. एका कॉलेजवयीन मुलीनं दाखवलेल्या कल्पकतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

    उदयपूर, 6 डिसेंबर: केवळ एका अजगराला रस्ता पार करता यावा, यासाठी तरुणीनं (Traffic stopped for Python) अख्खं ट्रॅफिक रोखून धरल्याची घटना समोर आली आहे. अनेकदा रस्त्यात आपल्याला (Animals in the road) प्राणी दिसतात. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा असे प्राणी रस्त्याच्या कडेला असतात की रस्ता पार करताना त्यांचा मृत्यू होण्याची (Death of animals) शक्यता असते. ही बाब माहिती असूनही अनेकजण त्यांना टाळून पुढे निघून जातात. मात्र असं न करता संवेदनशीलता दाखवत एका तरुणीनं अजगराला एक (Life saved) प्रकारे जीवदानच दिल्याची घटना घडली. रस्त्यावर दिसलं अजगर राजस्थानमधील उदयपूरमध्ये बीडीएसला शिकणारी प्रियांशी वैष्णव ही आईसोबत फिरायला बाहेर गेली होती. रात्री फिरून घरी येत असताना तिला वाटेत एक अजगर सुस्त अवस्थेत पडल्याचं दिसलं. हे अजगर रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र रस्त्यावरून भरधाव ट्रॅफिक सुरू असल्यामुळे ते गांगरलं होतं. अशा परिस्थितीत हे अजगर रस्ता कसा पार करेल, असा प्रश्न तिला पडला. आपण या अजगराला असेच सोडून निघून गेलो, तर कदाचित एखादं वाहन अजगराच्या अंगावरून जाईल आणि त्यात त्याचे प्राण जातील, अशी भीतीदेखील तिला वाटली. काही वेळ तिने विचार केला आणि अखेर त्या अजगराला मदत करण्याचा निर्णय़ घेतला. हे वाचा- ख्रिसमसदिवशी असं काही घडेल की संपूर्ण जग हादरेल; टाइम ट्रॅव्हलरचा धक्कादायक दावा रोखलं ट्रॅफिक तरुणीने पुढाकार घेत एका बाजूनं येणाऱ्या कारला थांबण्याचा इशारा केला. त्याच्यासोबत आणखी दोन कार थांबवल्या आणि त्यांना काही वेळ तिथंच थांबण्याची विनंती केली. एका बाजूची वाहनं थांबल्यानंतर ती दुसऱ्या बाजूला गेली आणि तिकडून येणाऱ्या वाहनांनाही तिनं थांबवलं आणि काय घ़डत आहे, याची कल्पना दिली. दोन्ही बाजूची वाहनं थांबल्यानंतर सुस्तावस्थेत पडलेलं अजगर सतर्क झालं आणि हळूहळू त्यानं रस्ता पार केला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ते झाडीत गायब झालं. त्यानंतर सर्वांनीच टाळ्या वाजवून तरुणीचं कौतुक केलं आणि ट्रॅफिक पुन्हा पूर्ववत झालं. शहरात या तरुणीनं दाखवलेल्या अनोख्या कल्पकतेची चर्चा रंगली होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Python, Small girl, Traffic

    पुढील बातम्या