बूंदी, 1 डिसेंबर : देशात, राज्यात चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र, असे असले तरी प्रामाणिकपणासुद्धा जीवंत असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. कोरोनाच्या संकटानंतर सर्वसामान्य जनता गंभीर आर्थिक संकटातून जात असताना कोणी नैतिकदृष्ट्या खंबीर असेल तर ते खरोखरच कौतुकास्पद आहे. एका मुलीने तिच्यासाठी प्रामाणिकपणाच सर्वकाही आहे, असे दाखवून दिले आहे.
नेमकं काय घडलं -
एका मुलीने सापडलेली सोनसाखळी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवला आहे. राजस्थानच्या निमोठा येथे राहणाऱ्या पूजा मेहरा हिला वाटेत पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी पडलेली आढळून आली. पूजा मेहरा यांनी सोनसाखळी परत केल्यानंतर राजू पटेल आणि त्यांच्या पत्नीने मुलीचे मनापासून आभार व्यक्त केले. यावर खूश होऊन पती-पत्नीने बक्षीस म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश मुलीला दिला.
या घटनेबाबत पूजाने सांगितले की, ती गावाजवळील एका लग्नाच्या बागेत आयोजित एका लग्न समारंभात जेवायला जात होती. यादरम्यान त्यांना वाटेत सोनसाखळी पडलेली दिसली. पूजाने जी साखळी उचलली आणि ती साखळी तिने स्वत:कडे न ठेवता तिच्या मूळ मालकाकडे नेण्याचा निर्णय घेतला आणि मग मैरिज गार्डन आयोजित केलेल्या लग्न समारंभात जेवायला गेली.
हेही वाचा - लग्नानंतर एका वर्षातच तरुणीचा भयानक शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...
लग्न समारंभात जेवण करून गावी परतत असताना पूजाने काही लोकांकडून तिच्याच गावातील राजू पटेल यांची पाच लाखांची सोनसाखळी हरवल्याची चर्चा ऐकली. त्यानंतर पूजा पटेल ही सोन्याची साखळीचे मूळ मालक राजू पटेल यांना परत करण्यासाठी तिच्या घरी पोहोचली.
याप्रकारे राजू पटेल यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी परत करून पूजाने प्रामाणिकपणा दाखवला आहे. पूजा मेहराच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन गावकरी आणि आजूबाजूचे लोक मोकळ्या मनाने मुलीचे कौतुक करत आहेत. जिल्ह्यातील प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या युवक-युवतींचा सत्कार एसपी जय यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.