Home /News /national /

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, हत्या करुन शव झाडावर लटकवलं; 7 अल्पवयीन ताब्यात

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, हत्या करुन शव झाडावर लटकवलं; 7 अल्पवयीन ताब्यात

परीक्षा संपली म्हणून पार्टी करूया असं सांगून मुलांनी तिला एका घरात बोलावलं होतं...

    तेजपूर, 2 मार्च : आसाममधील (Assam) विश्वनाथ जिल्ह्यातील 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. बलात्कार केल्यानंतर या अल्पवयीन मुलांनी हत्या करुन तिला झाडावर लटकवलं. परीक्षा संपल्यानंतर पार्टी करण्यासाठी म्हणून जमलेले असताना या अल्पवयीन मुलांनी हे दुष्कृत्य केलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 7 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून या मुलांनी 10 वीच्या बोर्डाची परीक्षा दिली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. हे सर्व हाय स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचे विद्यार्थी होते'. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिताच्या काकांनी पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘आमची मुलगी शुक्रवारी घरी परतली नाही. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. ती रात्रीपर्यंत घरी आली नव्हती, म्हणून आम्ही शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी आम्हाला जंगलामध्ये काहीतरी हालचाल दिसली. तेथे काही मुलं होती. त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि ते पळून गेले.’ यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क केला आणि जंगलात मुलीचा शोध सुरू केला.  मुलीचा शोध सुरू असताना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. हे वाचा - तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुलीसमोरच केला गोळीबार, पुण्यातील धक्कादायक घटना कुटुंबीयांनी जवळ जाऊन पाहिलं तर दुर्देवाने तो त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीचा होता. ते पाहून कुटुंबीय हादरले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘परीक्षा संपल्यानंतर मजा मस्ती म्हणून त्यांनी पार्टी करण्याचं ठरवलं. यावेळी या ७ मुलांनी त्या 12 वर्षीय मुलीलाही बोलावले. त्यांनी एका बंद घरात तिला यायला सांगितलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी या मुलीवर बलात्कार करुन तिला जीवे मारण्यात आलं व तेव्हा तिचा मृतदेह झाडावर लटकवला. त्यानंतर शनिवारी जेव्हा तपास केला तेव्हा तिचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसला’.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Gang rape

    पुढील बातम्या