लग्न करण्यासाठी निघालेल्या मुलीवर बलात्कार

लग्न करण्यासाठी निघालेल्या मुलीवर बलात्कार

बलात्काराच्या दोन घटनांनी उत्तर भारत हदरला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली/लुधियाना, 12 फेब्रुवारी: बलात्काराच्या दोन घटनांनी पंजाब हदरला आहे. अमृतसर येथे एका अल्पवयीन मुलीवर आणि लुधियाने येथे एका 21 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

लग्न करण्यासाठी निघालेल्या मुलीवर बलात्कार

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी दिल्लीला निघालेल्या तरुणीवर बलात्कार झाला. पीडित मुलगी 15 वर्षाची असून ती दिल्लीला निघाली होती. मात्र चुकून त्या मुलीने दुसरी गाडी पकडल्याने ती अमृतसरला पोहोचली. अमृतसर स्थानकात तिने रिक्षाचालक साहिब याला दिल्लीला जाणाऱ्या गाडीबद्दल विचारले. त्यावर साहिब याने पीडित मुलीला रेल्वे सकाळी असल्याचे सांगितले आणि एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या मित्राने पीडित मुलीवर बलात्कार केला. आरोपींनी सकाळी पीडित महिलेला लुधियानाला जाणाऱ्या बसमध्ये बसवले. तसेच या घटनेबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे.

सामूहिक बलात्कार...

पंजाबमधील लुधियानाच्या जवळ असलेल्या इस्सेवाल गावात एका २१ वर्षीय तरुणीवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला एका मित्रासोबत गाडीमधून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी रोखली आणि दोघांना बाहेर काढले. आरोपींनी तरुणाला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

स्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...

First published: February 12, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading