Home /News /national /

क्रेटा नाकारल्यानं लग्न मोडलेल्या तरुणीसाठी स्थळांची रांग, बदलतंय सामाजिक चित्र

क्रेटा नाकारल्यानं लग्न मोडलेल्या तरुणीसाठी स्थळांची रांग, बदलतंय सामाजिक चित्र

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या भावी पतीला धडा शिकवणारी तरुणी देशभर चर्चेत आली होती. तिला आता इतर अनेक उच्चपदस्थ तरुणांची स्थळं येत आहेत.

    महेंद्रगढ, 8 डिसेंबर: क्रेटा गाडी हुंड्यात देण्याची  (Dowry demand) मागणी पूर्ण न केल्यामुळे लग्न मोडलेल्या (Marriage broken) तरुणीला आता अनेक उच्चशिक्षित तरुणांकडून (Proposals from educated boys) मागणी येऊ लागली आहे. लग्नात हुंडा म्हणून क्रेटा गाडी दिली नाही, अशी तक्रार करत भावी पतीनं लग्न रद्द केलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे (Marriage cancelled by groom) नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आलीच नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीनं पोलीस ठाण्यात नोंदवल होती. त्या तरुणीचं आता सर्व स्तरातून कौतुक होत असून हुंडा न घेता लग्न करण्यासाठी अनेक उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरूण या तरुणीला मागणी घालत असल्याचं चित्र दिसत आहे. काय आहे घटना? हरियाणातील महेंद्रगढमध्ये राहणाऱ्या तरुणीचं 22 नोव्हेंबर रोज लग्न ठरलं होतं. मात्र 14 लाख रुपयांची क्रेटा कार मिळावी, यासाठी भावी नवरा अडून बसला होता. या हट्टापायी त्या दिवशी वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी आलीच नाहीत. वधूकडील सर्वजण तयारी करून वऱ्हाडींचं स्वागत करण्यासाठी सज्ज होते. मात्र आपल्याला गाडी मिळाली नाही, म्हणून रुसलेल्या नवऱ्याने लग्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तरुणीची पोलीस तक्रार या वागण्याने संतापलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकारामुळे आपली समाजात बदनामी झाली असून तरुण आणि त्याच्या आईवडिलांविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली होती. तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांची जामीनावर सुटका केली होती. हे वाचा - फोटो काढला म्हणून तरुणीची हत्या, ड्रग्जच्या नशेत गुन्हेगारांनी केलं तरुणीचं दफन मुलीला येतायत स्थळं आपल्या धाडसी निर्णयामुळे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या या मुलीला आता अनेक तरुणांनी स्थळं यायला सुरुवात झाली आहे. पोलीस अधिकारी, वकील, इंजिनिअर, डॉक्टर अशा 20 पेक्षा अधिक तरुणांनी या तरुणीला मागणी घातली आहे. आपल्याला कुठल्याही हुंड्याची अपेक्षा नसून अशा विचारी, हुशार आणि धाडसी मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचं या तरुणांनी म्हटलं आहे. तर हुंडा मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तरुणाची नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Haryana, Marriage

    पुढील बातम्या