दारुड्या नवऱ्या मुलाला मुलीचा नकार; तरी फिल्मी स्टाईल झालं लग्न

दारुड्या नवऱ्या मुलाला मुलीचा नकार; तरी फिल्मी स्टाईल झालं लग्न

नवऱ्या मुलीनं दारुड्या मुलाशी लग्नास नकार दिल्यानंतर सर्व काही एखाद्या चित्रपटाला शोभावं असं घडलं.

  • Share this:

गाजियाबाद, 09 मे : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एखाद्या चित्रपटाला शोभावा असा विवाह सोहळा पार पडला. घरात मुलीचं लग्न असल्यानं आनंदाचं वातावरण होतं. लग्नघटिका देखील जवळ आली होती. दिल्लीतील रोहिणी भागातून वऱ्हाडी मंडळी देखील दाखल झाली. अक्षता वाटल्या गेल्या आणि एका क्षणात सर्व काही शांत झालं. आनंदाचं वातावरण असलेल्या मंडपात सन्नाटा पसरला. कारण, नवऱ्या मुलीनं लग्नाला नकार दिला होता. त्याला कारण देखील तसंच होतं. लग्नाच्या वेळी नवरा मुलगा हे नशेत होता. दारू पिऊन तर्राट होता. त्याला नीटपणे उभं देखील राहता येत नव्हतं. त्यामुळं मुलीनं लग्नास नकार दिला होता. वऱ्हाडी मंडळी मागे फिरली होती. नाचं, गाणं बंद झालं होतं. आता काय करायचं याच विचारात मुलीच्या घरची मंडळी होती.

महाराष्ट्रातील 'या' जागेवर लागू शकतो सर्वात वेगवान निकाल

चित्रपटाला शोभावा असं सीन

मुलीनं दारूड्या नवऱ्या मुलाला नकार दिला होता. त्यामुळे आता मुलीशी लग्न करणार कोण? आई-वडील, घरच्यांमध्ये यावर विचार सुरू होता. काय करावं बरं? यावर विचार सुरू होता. तेवढ्यातच नात्यातील एका मुलानं मी लग्न करायला तयार आहे असं म्हटलं. त्यामुळे सर्वांना काही क्षण काय बोलावं हेच कळेना. पण, अखेर सर्वांच्या विचारानं या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. मुलीनं देखील मुलाला होकार दिला. एखाद्या चित्रपटाला शोभावं असाच हा सीन होता.

VIDEO: ममता बॅनर्जी अहंकारी, पंतप्रधान मोदींचा घणाघात

First published: May 9, 2019, 12:04 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading