बॉयफ्रेंडमुळे लेकीनं केली आईची हत्या, डोळ्यांत मिर्ची फेकून आवळला गळा!

अपरिहार्यतेमुळे आईची हत्या केल्याची कबुली आरोपी तरूणीने किर्ती रेड्डीने दिली. जन्म देणाऱ्या आईची विद्यार्थीने निर्घृण हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 03:13 PM IST

बॉयफ्रेंडमुळे लेकीनं केली आईची हत्या, डोळ्यांत मिर्ची फेकून आवळला गळा!

हैदराबाद, 01 नोव्हेंबर : जन्म देणाऱ्या आईची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनीला ताब्यात घेतलं आहे. मुलीने आईची हत्या का केली यासंदर्भात धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. अपरिहार्यतेमुळे आईची हत्या केल्याची कबुली आरोपी तरूणीने किर्ती रेड्डीने दिली. जन्म देणाऱ्या आईची विद्यार्थीने निर्घृण हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी किर्ती आणि तिला ब्लॅकमेल करणारा तिचा मित्र शशि कुमार याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशि हा किर्तीचा मित्र होता. तो वारंवार तिला ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे किर्तीने आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. तर या प्रकरणात किर्तीचा आणखी मित्र बाल रेड्डीवरही पोलिसांनी बलात्काराचा आरोप लगावला आहे. शशीला कीर्ती आणि बाल रेड्डी यांच्यात शारीरिक संबंध असल्याची माहिती मिळाली.  त्यावरून तो किर्तीला ब्लॅकमेल करत होता. तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्यासाठी कीर्तीला ब्लॅकमेल केलं. भीतीने कीर्ती दबावाखाली आली आणि तिने आईच्या हत्येच्या कट रचला. कीर्ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे किर्तीच्या संपत्तीवर शशीची डोळा होता.

पोलिसांनी दोन्ही मित्रांना केली अटक

कीर्तीचा प्रियकर बाल रेड्डी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. कीर्ती अल्पवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर शशीसमवेत कीर्तीचा गर्भपात केल्याचा देखील आरोप आहे.

डोळ्यांत लाल मिर्ची पावडर टाकून गळा आवळून केली आईची हत्या

Loading...

रचकोंडा आयुक्त महेश भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, 'कीर्तीचे वडील श्रीनिवास रेड्डी कामानिमित्त घराबाहेर होते. तेव्हा कीर्ती आणि तिचा मित्र शशी यांनी कीर्तीची आई रजिताला ठार मारण्याचा कट रचला. घटनेच्या रात्री राजिता झोपल्या होत्या आणि फोन पाहत होत्या. त्याचवेळी शशीने त्यांच्या डोळ्यांत लाल तिखट टाकलं. डोळ्यात मिर्ची गेल्याने त्यांना काही दिसत नव्हतं. त्यात घरातील सगळे दिवे घावण्यात आले होते. त्यानंतर कीर्ती तिच्या आईवर बसली आणि त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतरही, शशिने टॉवेलने रजित यांचा  गळा आवळला. '

तीन दिवसांनंतर आईचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकला

या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतरही दोघे थांबले नाहीत. त्यांनी मृत रजिता यांचा  मृतदेह बेडरूममध्ये ठेवला होता. तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला. तेव्हा दोघांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री मृतदेहाला चादरीत गुंडाळलं. यानंतर त्यांनी शशीच्या कारमध्ये मृतदेह ठेवला आणि राममनापेट इथल्या रेल्वे ट्रॅकवर फेकला. त्यानंतर त्यांनी चादर आणि दोरी जाळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Nov 1, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...