Home /News /national /

मुलीनं विचारलं, तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? वाचा राहुल गांधी काय म्हणाले

मुलीनं विचारलं, तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? वाचा राहुल गांधी काय म्हणाले

काँग्रेस पक्षाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट तांत्रिक कामासाठी तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट तांत्रिक कामासाठी तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे.

एका मुलीनं राहुल गांधी यांना भर कार्यक्रमात एक प्रश्न विचारला. हा प्रश्न असा होता, की तुम्हाला गर्लफ्रेंड (girlfriend) आहे का?

    नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अनेकदा काही ना काही कारणानं चर्चेत असतात. अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे ट्वीटरवर ट्रोल होत असतात. तर, अनेकदा सामान्य जनतेसोबतचा त्यांचा संवाद नागरिकांची मनं जिंकत असतो. अशात आता राहुल गांधी पद्दुचेरीमधील आपल्या कार्यक्रमामुळे चर्चेत आले आहेत. इथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी अनेकांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न केले आणि राहुल गांधीनीही या प्रश्नांची उत्तरं दिली. याच संवादादरम्यान एका मुलीनं राहुल गांधी यांना भर कार्यक्रमात एक प्रश्न विचारला. हा प्रश्न असा होता, की तुम्हाला गर्लफ्रेंड (girlfriend) आहे का? इतर वेळी राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल आणि चर्चाही होतात आणि प्रश्नही उपस्थित होतात. मात्र, या मुलीनं थेट भर कार्यक्रमात गर्लफ्रेंडबद्दलचा प्रश्न विचारल्यानं राहुल गांधीही काही वेळ बुचकळ्यात पडले. नंतर त्यांनी हसून या मुलीला उत्तर दिलं. राहुल गांधी म्हणाले, की या प्रश्नाचं उत्तर मी नंतर कधीतरी देईल. राहुल गांधी या प्रश्नाचं काय उत्तर देणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागलं होतं, मात्र राहुल यांनी वेळ मारुन नेली आणि या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. कार्यक्रमादरम्यान एका मुलीनं त्यांना सर अशी हाक मारली. यावेळी माझं नाव सर नसून राहुल असं असल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच तुम्ही मला राहुल अण्णा म्हणू शकता, असंही ते म्हणाले. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ काँग्रेसनं शेअर केला आहे. यात एका अर्थशास्त्राच्या विद्यार्थीनीनं राहुल गांधींना त्यांच्या वडिलांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, की हिंसाचार तुमच्याकडून काहीही हिसकावून घेऊ शकत नाही. मला कोणाच्याही बाबतीत राग नाही. मी माझ्या वडिलांना गमावलं आणि तो क्षण माझ्यासाठी अतिशय दुःखद होता. मला या घटनेचा खूप त्रास झाला, मात्र मला याचा राग नाही. माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या