News18 Lokmat

गिरीराज सिंह यांचा बेगुसरायमधून लढायला नकार

भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची बेगुसरायमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांना नवादामधून लढण्याची इच्छा आहे. ही बातचीत करण्यासाठीच त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट मागितली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 08:18 PM IST

गिरीराज सिंह यांचा बेगुसरायमधून लढायला नकार

नवी दिल्ली, २५ मार्च : भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची बेगुसरायमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांना नवादामधून लढण्याची इच्छा आहे. ही बातचीत करण्यासाठीच त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट मागितली आहे.

बिहारमधल्या या बेगुसरायमधून सीपीआयने कन्हैयाकुमार यांना उमेदवारी दिली आहे. कन्हैयाकुमार यांच्याशी लढत देऊन भाजपची ही जागा राखण्याची जबाबदारी गिरीराज सिंह यांच्यावर होती. पण इथून लढण्यासाठी तेच राजी नाहीत. भाजपच्या अनेक नेत्यांनी याबद्दल गिरीराज सिंह यांची मनधरणी केली पण गिरीराज सिंह यांना नवादामधूनच लढायचं आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत गिरीराज सिंह नवादामधून जिंकले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी आपला विचार नक्की करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे काही वेळ मागितला आहे. अमित शहा आणि गिरीराज सिंह यांच्या बैठकीत या वादावर तोडगा निघू शकतो.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव आणि बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांच्यासह पक्षाच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी गिरीराज यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही.

दुसरीकडे, कम्युनिस्ट पार्टीचा गड असलेल्या बेगुसरायमधून कन्हैयाकुमार निवडणूक लढणार आहे. आपली खरी टक्कर गिरीराज सिंह यांच्याशीच आहे, असं कन्हैयाकुमार यांनी म्हटलं आहे. गिरीराज सिंह यांनी या जागेवरून लढायला नकार दिला तर त्यांच्याजागी भाजप कोण उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बेगुसरायमधून लढत दिली तर कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे ही जागा 'हॉट सीट' ठरणार आहे.

Loading...


=====================================================================================================================================================================


VIDEO : नातीने औक्षण करून गडकरींना भरवली दही-साखरबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...