सिंहाचा मृत्यू प्रकरणी केंद्र आणि गुजरात सरकारला सुप्रिम कोर्टाने फटकारले

सिंहाचा मृत्यू प्रकरणी केंद्र आणि गुजरात सरकारला सुप्रिम कोर्टाने फटकारले

गीर अभयरण्यातील सिंह मृत्यू प्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला फटकारलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : गीर अभयरण्यातील सिंह मृत्यू प्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला फटकारलंय. सिंहाच्या मृत्यू प्रकरणी केंद्र आणि गुजरात सरकारला सुप्रिम कोर्टानं सवाल केलाय. हे अतिशय गंभीर प्रकरण असून, सरकारने लवकरच या प्रकरणाची चौकशी करावी असा आदेश कोर्टानं दिलाय.

हिंस्र श्वापद असलं तरी जंगलाच्या या राजाचं संरक्षण व्हायला हवं अशी महत्वापूर्ण भूमीका सुप्रिम कोर्टानं स्पष्ट केलीय. गीरच्या अभायरण्यातला जंगलाचा राजा धोक्यात सापडलाय. गीरच्या जंगलात गेल्या महिनाभरात 21 सिंहांचा मृत्यू झालाय. हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावलेत. मेलेल्या 21 पैकी चार सिंहांना सीडीव्ही व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचतो. टांझानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहांची एक प्रजातीच नष्ट झाली होती.

दरम्यान, या भागातील उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी रेस्क्यू सेंटरची एक विशेष टीम वेगाने कामाला लागली आहे.

 VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

First published: October 3, 2018, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading