पंतप्रधान मोदींनी चीनच्या अध्यक्षांना दिलेलं 'गिफ्ट' पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

पंतप्रधान मोदींनी चीनच्या अध्यक्षांना दिलेलं 'गिफ्ट' पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

108 किलो वजनाचा अन्नम दिवा आणि तंजावूर शैलीतलं सरस्वतीचं नृत्यू करणारं खास पेंटिंग अशा या दोन वस्तू पंतप्रधानांनी जिनपिंग यांना दिल्यात.

  • Share this:

महाबलीपुरम् 11 ऑक्टोंबर : महाबलीपुरम् 11 ऑक्टोंबर : भारत भेटीवर आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं आज चेन्नईत भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांना शाही मेजवानी दिली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी महाबलीपुरम इथल्या काही ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्यावेळी जिनपिंग यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. यावेळी दक्षिण भारतातल्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन चीनच्या अध्यक्षांना घडविण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांनी काही प्राचीन मंदिरांनाही भेटी दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष जिनपिंग यांना दोन खास भेटवस्तू दिल्या. प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या या वस्तू अतिशय सुंदर आणि थक्क करणाऱ्या आहेत.

कशाला हवाय विरोधी पक्ष? राज ठाकरेंनी केला खुलासा!

108 किलो वजनाचा अन्नम दिवा आणि तंजावूर शैलीतलं सरस्वतीचं नृत्यू करणारं खास पेंटिंग अशा या दोन वस्तू पंतप्रधानांनी जिनपिंग यांना दिल्यात. शुद्ध तांब्याचा असलेला आणि त्यावर सोन्याचा वर्ख असलेला हा दिवा नचियारकोइल इथला पातेर समुदाय तयार करतो. असे दिवे तयार करणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे.

12 कलाकारांनी 12 दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या आग्रहावरून हा खास दिवा तयार केलाय. तर सरस्वतीचं पेंटिंग 'पलगई पद्म'' या नावाने ओळखलं जातं. अतिशय सुंदर आणि मोहक नक्षीकाम असलेले हे पेंटिंग लाकडावर तयार केलं जातं. तंजावूरला चित्रकलेल्या या शैलीचा 16 व्या आणि 18 व्या शतकात नायक आणि मराठा राजांच्या कार्यकाळात विकास झाला. या पेंटिंगला अतिशय पवित्र समजलं जातं.

'मावळ प्रमाणेच रोहित पवारांचंही पार्सल जनता परत पाठवणार'

चीनच्या अध्यक्षांसाठी खास मेन्यू

पंतप्रधान मोदी हे शी यांच्यासह चीनी शिष्टमंडळाला शाही मेजवानी देणार असून त्यासाठी खास मेन्यू तयार करण्यात आलाय. हा मेन्यू तयार करण्यासाठी शी आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाच्या आवडी-निवडी यांची खास काळजी घेण्यात आलीय. शी यांची आवड लक्षात घेऊन दुपारच्या जेवणात कांदा आणि मीट यांचा वापर असलेले पदार्थ, गाजर आणि पत्ता कोबी घालून केलेलं फ्राईड लिव्हर, नुडल्स आणि विविध प्रकारचे सूप आहेत. त्याच बरोबर दक्षिण भारतीय पदार्थांचीही रेलचेल राहणार आहे. त्यात बासमती भाताचे विविध पदार्थ, सांबार, वडा कुलंबू, रस्सम, बिर्याणी, बटर नान, रोटी, टोमॅटो आणि गाजराचं सूप यांचा समावेश आहे.

हे पैसे कुणाचे? Innova कारमधून 30 लाख जप्त; निवडणुकीत पैशांचा खेळ!

तर नाश्त्यामध्ये डोसा, इडली, वडा, सांबार, चटनी, वेन पोंगल, इडियप्‍पम आणि वडा करी  यांचा समावेश आहे. हे पदार्थ बनविण्याची जबाबदारी खास शेफवर सोपविण्यात आलीय. यासाठीचे सर्व पादार्थ अतिशय उच्च प्रतिचे आणि ऑरगॅनिक पद्धतीचे असतिल याची काळजी घेण्यात आलीय. त्याचबरोबर एक खास शेफ शी जिनपिंग यांना इथल्या पदार्थांचा माहिती देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading