‘काँग्रेसच्या नेत्यांची लोकांशी नाळ तुटली, फाईव्ह स्टार कल्चर बंद करा’; गुलाम नबी आझाद भडकले

‘काँग्रेसच्या नेत्यांची लोकांशी नाळ तुटली, फाईव्ह स्टार कल्चर बंद करा’; गुलाम नबी आझाद भडकले

तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं जातं. ज्या गावी रस्ते नाहीत तिथे हे नेते जात नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली 22 नोव्हेंबर: बिहारमधला (Bihar) पराभव काँग्रेसच्या (Congress) जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पक्षात विरोधाचे स्वर उमटत असून आता ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Aazad) यांनी पक्षातल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची लोकांसोबत असलेली नाळ तुटली आहे. पक्षात फाईव्ह स्टार कल्चरही आलं आहे. हे कल्चर बंद झाल्याशिवाय विजय मिळणार नाही असं परखड मत आझाद यांनी व्यक्त केलं. मी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बोलत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आझाद म्हणाले, पक्षाच्या सततच्या पराभवाने आम्ही चिंतित आहोत. खासकरून बिहारमधल्या आणि इतर  राज्यांमधल्या पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर ही चिंता जास्तच वाढली आहे. य पराभवासाठी पक्ष नेतृत्व हे जबाबदार नाही. मात्र त्यांनी पक्षातल्या नेत्यांच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित केलेत. नेते लोकांमध्ये जात नाहीत. त्यांची लोकांशी असलेली नाळ तुटली आहे. तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं जातं. ज्या गावी रस्ते नाहीत तिथे हे नेते जात नाहीत. असाच व्यवहार राहिला तर निवडणुका कशा जिंकता येतील असा सवालही त्यांनी केला.

तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बलांवर हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सिब्बल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अशा वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खरगे म्हणाले, सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे आणि नेत्यांमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष कमकूवत बनतो असंही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा नष्ट झाली तर आपण सगळेच संपून जाऊ असंही ते म्हणाले.

या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला आहे. उगाच फुकाचे सल्ले देण्यापेक्षा अशा नेत्यांनी काँग्रेस सोडून जावं अशी टीका काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 22, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या