‘हैदराबादमधली ‘निजाम संस्कृती’ संपवणार’, पालिका निवडणुकीसाठी अमित शहा मैदानात

‘हैदराबादमधली ‘निजाम संस्कृती’ संपवणार’, पालिका निवडणुकीसाठी अमित शहा मैदानात

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीने (GHMC Polls) सर्व देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाजपने या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

  • Share this:

हैदराबाद 29 नोव्हेंबर:  हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीने (GHMC Polls)  सर्व देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाजपने या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah)  हे रविवारी प्रचारासाठी मैदानात उतरले होते. सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये त्यांनी रोड शो करत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. हैदराबादमधली निजाम संस्कृती संपवणार असल्याचंही ते म्हणाले. हैदराबादला एक आधुनिक शहर बनवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

रोड शो नंतर शहा यांनी पत्रकार परिषध घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. हैदराबादसारखं मोठं शहर हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात असून त्याला आधुनिक शहर बनविण्यासाठी भाजप कटिबद्द असल्याचंही ते म्हणाले. हैदराबाद हे आयटीचं हब म्हणून उदयाला येवू शकते. त्यामुळे हजारो तरूणांना रोजगार मिळू शकतो मात्र सध्याचं राज्य सरकार त्यासाठी काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला.

हैदराबाद महापालिकेचं बजेट हे तब्बल 5 हजार कोटींचा आहे. देशातल्या मोठ्या महापालिकांपैकी ती एक असल्याने भाजपला त्यावर ताबा मिळवायचा असून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात आपला विस्तार वाढवायचा आहे. अनेक केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही हैदराबादमध्ये प्रचारासाठी गेले होते.

1 डिसेंबरला मतदान असून महापालकेची निवडणूक ही देशात प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. हैदराबादमध्ये भाजपने ज्या पद्धतीने आपली शक्ती पणाला लावली त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजप उतरणार असल्याचे संकेत असून त्यासाठी भाजपने तयारीलाही सुरूवात केली आहे.

मुंबई महापालिकेचं बजेट हे देशातल्या काही छोट्या राज्यांपेक्षाही जास्त आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने त्यावर ताबा ठेवण्यासाठी सगळ्याच पक्षांची चढाओढ असते. मात्र शिवसेनेने सलग अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर आपला ताबा कायम ठेवला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 29, 2020, 8:16 PM IST
Tags: Amit Shah

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading