Home /News /national /

GHMC Election Results 2020 LIVE : भाजप पिछाडीवर, TRS ची गाडी 60 जागांसुसाट वर आघाडी

GHMC Election Results 2020 LIVE : भाजप पिछाडीवर, TRS ची गाडी 60 जागांसुसाट वर आघाडी

सकाळी भाजपने पहिल्या टप्प्यात मुसंडी मारली होती खरी पण पुन्हा एकदा TRSची गाडी सुसाट पळाल्याचं पाहायला मिळालं.

    हैदराबाद, 04 डिसेंबर : हैदराबादमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी भाजपने पहिल्या टप्प्यात मुसंडी मारली होती खरी पण पुन्हा एकदा TRSची गाडी सुसाट पळाल्याचं पाहायला मिळालं. 12.30 पर्यंत हाती आलेल्या कलनुसार भाजप पिछाडीवर गेलं असून TRSनं पुन्हा आघाडी घेतली आहे. भाजप नेत्यांच्या मनातली धाकधूक वाढली असून अंतिम निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एमआयएम आणि TRS यांचा प्रत्येक एका जागेवर विजय झाला आहे. शुक्रावारी 12.30 वाजेपर्यंत दुसरा कल हाती आला आहे. BJP 21 जागांवर आघाडी TRS- 60 जागांवर आघाडी AIMIM 21  जागांवर आघाडी INC 02​​​ जागांवर आघाडी हे वाचा-ओवेसींचा गड असलेल्या हैदराबाद जिंकणं भाजपसाठी का महत्त्वाचे? 2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर असणार आहे. या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलणार का आणि एमआयएमला टक्कर देण्यात यशस्वी ठरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP, Hyderabad

    पुढील बातम्या