Home /News /national /

GHMC Election: काय आहे भारताची डोकेदुखी ठरलेले हैदराबादचे जिना कनेक्शन?

GHMC Election: काय आहे भारताची डोकेदुखी ठरलेले हैदराबादचे जिना कनेक्शन?

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या (GHMC Election) प्रचारात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी या प्रचारात AIMM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांचे अवतार असल्याची टीका केली होती. महंमद अली जिनांचे हैदराबाद शहराशी एक खास कनेक्शन होते.

पुढे वाचा ...
    हैदराबाद, 4 डिसेंबर : ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या (GHMC Election) प्रचारात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah)  यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी या प्रचारात AIMM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे जिना यांचे अवतार असल्याची टीका केली होती. त्या टीकेला ओवैसींनी कडक शब्दात उत्तर दिल्यानं राष्ट्रीय राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. हैदराबाद शहराशी मोहम्मद अली जिना यांचे असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिना यांनी फूस लावल्यानेच हैदराबादचे तत्कालीन संस्थानिक निजामाने भारतामध्ये विलिनीकरण करण्यास विरोध केला होता असे या विषयाच्या अनेक अभ्यासकांचे मत आहे. जिना यांनी हैदराबादमध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणूनच त्यांनी निजामाला भारताच्या विरोधात फितवले होते, असे अभ्यासकांचे मत आहे. फाळणीनंतरची परिस्थिती भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान या नव्या देशाची ऑगस्ट 1947 मध्ये निर्मिती झाली. भारतामध्ये तेंव्हा असलेल्या संस्थानांमध्ये काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद या संस्थानांचे संस्थानिक भारतामध्ये विलीन होण्यास टाळाटाळ करत होते. त्यामधील हैदराबाद आणि जुनागड संस्थानातील बहुसंख्य जनता ही हिंदू होती. हैदराबादचे संस्थानिक असलेल्या निजामाला जिनांची फूस होती. त्यामुळे तो सतत भारताच्या विरोधी कृती करत होता. ‘मशहूर उस्मान अली खान’ हे तेंव्हाच्या निजामाचे पूर्ण नाव. तो त्याच्या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. त्याची जवळपास 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती होती. त्याचबरोबर दागिण्यांचा मोठा खजिना होता. निजामाकडे जवळपास 20 कोटी अमेरिकन डॉलर्स किंमतीचा एक हिरा होता. त्या हि-याचा ते चक्क पेपरवेट म्हणून उपयोग करत होते. हैदराबादचे निजाम कनेक्शन हैदराबाद विलिनीकरणावर पुस्तक लिहिणाऱ्या प्रा. डॉ. उमा जोसेफ यांनी BBC शी बोलताना सांगितले की, “हैदराबाद आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार निजामाने परराष्ट्र धोरण भारत सरकारकडे सोपवणे आवश्यक होते. मात्र तो त्याच्या नेमकं उलट करत होता’’. ज्येष्ठ लेखक ए.जी. नुरानी यांनी देखील हैदराबाद संस्थानातील जिनांच्या गुंतवणुकीवर सविस्तर लेखन केले आहे. “ मोहम्मद अली जिनांनी मार्च 1947 मध्ये हैदराबाद संस्थानात दोन लाखांची गुंतवणूक केली होती. ते भारताचा बदला घेण्यासाठी स्वत:च्या माणसांमार्फत जिनांना भारताच्या विरुद्ध चिथावत होते”,  असे नुरानी यांनी स्पष्ट केले आहे. ‘द डिस्ट्रक्शन ऑफ हैदराबाद’ या पुस्तकात देखील त्यांनी या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले आहे. निजाम सातत्याने पाकिस्तान आणि जिना यांच्या संपर्कात होता. जिनाने निजामाशी घट्ट संधान बांधले होते. निजाम-जिना या अभद्र युतीमुळे देशाच्या अगदी मध्यभागी नवे पाकिस्तान निर्माण होण्याची भीती भारत सरकारला सतावत होती. हैदराबाद संस्थानामध्ये 85 टक्के हिंदू आणि 15 टक्के मुस्लीम होते. तेथील बहुसंख्य जनतेची भारतामध्ये सामील होण्याची इच्छा होती. या नागरिकांनी हैदराबाद मुक्ती संग्रमाचे आंदोलन उभारले. निजामाने त्याच्या पोलीस दलाच्या म्हणजेच रझाकाराच्या मदतीने ते आंदोलन पाशवी पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला. संस्थानातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. निजामाशी समोपचाराने वाटाघाटी करण्याचे सर्व मार्ग संपल्यानंतर सैनिकी कारवाई केली. या सैनिकी कारवाईनंतर 18 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीन झाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hyderabad

    पुढील बातम्या