Home /News /national /

हैदराबाद निवडणुकीत MIM मधून उभ्या राहिलेल्या त्या 5 हिंदू उमेदवाराचं काय झालं?

हैदराबाद निवडणुकीत MIM मधून उभ्या राहिलेल्या त्या 5 हिंदू उमेदवाराचं काय झालं?

जुन्या हैदराबादमध्ये (GHMC Election) ज्या भागात हिंदू आणि मुस्लिम मतदारांची समान संख्या आहे आणि तो भाग AIMIM च्या आमदाराच्या विधानसभात मतदार संघात येतो अशाच ठिकाणी हे हिंदू उमेदवार देण्यात आले होते.

    हैदराबाद, 5 डिसेंबर : एमआयएमचा (MIM) बालेकिल्ला असलेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी 51 जागांवर एमआयएमचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी 5 जागांसाठी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत. ज्या भागात हिंदू आणि मुस्लीम मतदारांची समान संख्या आहे आणि तो भाग एमआयएमच्या आमदाराच्या विधानसभात मतदार संघात येतो अशाच ठिकाणी हे हिंदू उमेदवार देण्यात आले होते. या 5 हिंदू उमेदवारांपैकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत. तर दोन जागी त्यांना पराभरावाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला सर्वाधित 55 जागा मिळाल्या आहेत तर एमआयएमला 44 जागांवर यश मिळालं आहे. मुस्लीम विद्यार्थिनीने मिळवली संस्कृतमध्ये PHD! प्रबंधासाठी सुवर्णपदक देऊन गौरव असददुद्दीन ओवेसी यांच्या इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाकडून हिंदू उमेदवारांमध्ये पुरानापूल वॉर्डातून सुन्नम राज मोहन, फलकनुमा वॉर्डातून के थाराभाई आणि कारवान वॉर्डातून मांदगिरी स्वामी यादव विजयी झाले आहेत. तर जामबाग बॉर्जात जदाला रविंद्र यांना भाजपच्या राकेश जसस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कुतुबुल्लापूर वॉर्डातून एमआयएमचे ई,राजेश गौड यांना टीआरएस पत्रात्या गौरीश पारिजाता यांनी मात दिली आहे. ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर हैदराबाद महापालिका निवडणूक निकालांनी सगळ्यांनाच दिवसभर घाम फोडला. सकाळी भाजपने जोरदार मुसंडी घेतली होती. त्यामुळे TRS आणि AIMIMला घाम फुटला. नंतर TRSने आघाडी घेतली आणि ती कायम राखली. मागच्या निवडणुकीत 4 जागांवर असलेल्या भाजपने 49 जागा घेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर ओवेसींचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भाजपने ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलविल्याने पक्षाचे नेत्यांनी जल्लोष केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीत टीआरएसला 56, भाजप 49 आणि एमआयएमला 42 जागा मिळाल्या आहेत. यात सर्वात जास्त लक्षवेधी ठरली ती भाजपची किमगिरी. भाजपने मोठी ताकद या ठिकाणी लावली होती. अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचाराला आले होते. भाजपकडून अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. हैदराबादमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय करत त्यांनी प्रचार केला आणि 2016च्या तुलनेत प्रचंड यश मिळवलं. ओवेसींचा गड असलेल्या हैदराबाद जिंकणं भाजपसाठी का महत्त्वाचे? हैदराबाद पालिका निवडणुकीत 2016 मध्ये काय होती परिस्थिती महापालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत 150 पैकी 99 जागा टीआरएसनी जिंकल्या होत्या. ओवेसींच्या एमआयएमने 60 जागा लढवून 44 जिंकल्या होत्या. भाजपला 3, काँग्रेसला 2 वॉर्डांतच विजय मिळाला होता. केसीआर आणि जुन्या हैदराबादमध्ये एमआयएमचंच वर्चस्व होतं. आतापर्यंत एमआयएमने विजय मिळवला त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवारच दिले होते. मुस्लिमबहुल ठिकाणीच आपलं राजकारण करणारा एमआयएम पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होऊ पाहतोय. एमआयएमने 2014 मध्ये तेलंगणात 7 2019 मध्ये महाराष्ट्रात 2 आणि 2020 मध्ये बिहारमध्ये 5 आमदार निवडून आणले आहेत. पक्षाचे नेते ओवेसी हे नेहमी संसदेत बाबरी मशीद, तीन तलाक, लव्ह जिहाद, नागरिकता संशोधन कायदा, एनआरसी असे अनेक मुद्दे वेळोवेळी मांडत आले आहेत, ज्यांचा थेट संबंध मुस्लिमांशी आहे. पश्चिम बंगालमधील 30 टक्के मुस्लिम जनतेच्या आधारे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी ते सध्या करत आहेत.
    First published:

    पुढील बातम्या