गाझियाबाद, 10 जुलै: चालत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशच्या ट्रॅफिक पोलिसांनी कार मालकाला तब्बल 18 हजार रुपयांचा दंड (Fine)आकारला आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ (video viral) पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता हा व्हिडिओ गाझियाबाद (Ghaziabad) मधला असल्याचं समोर आलं. व्हिडिओत दोन जण चालत्या ब्रेझा कार आणि एक स्कॉपिओ कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी करत होते.
घटनेचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
एका व्यक्तीनं दोघांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर व्हिडिओ ट्विट करुन गाझियाबाद पोलिसांना टॅग केलं होतं. पोलिसांनी तात्काळ या व्हिडिओची दखल घेत कारवाई केली. दोन्ही तरुणांना 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील एका कार मालकाची ओळख पटली असून तो पूर्व दिल्लीचा रहिवासी आहे. त्याा मालकाला 18,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
Ghaziabad | A video went viral where a boy was found sitting on the bonnet of the car. A fine of Rs 18,000 has been charged. If we find such viral videos then strict investigation is done: Ramanand Kushwaha, SP Traffic pic.twitter.com/LyXVLIkKpy
— ANI UP (@ANINewsUP) July 9, 2021
स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर अति वेगवान, ध्वनी प्रदूषण आणि इतर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे एसपी ट्रॅफिक रामानंद कुशवाहा यांनी सांगितलं की, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एक मुलगा गाडीच्या बोनटवर बसलेला आढळला आहे. त्याला 18 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. असे स्टंटबाजी करणाऱ्याचे व्हिडिओ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
हेही वाचा- मोठी बातमी: लस घेतली असेल तरच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी?
ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर उत्तर प्रदेश पोलीस कडक कारवाई करत आहेत. मार्च महिन्यातच पोलिसांनी अशाच घटनेसाठी एमव्ही अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली तरुणांच्या एका गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh, Video viral