Elec-widget

कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, भिंतीवर 500च्या नोटा चिटकवून दिला 'अंत्यसंस्काराचा खर्च'

कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, भिंतीवर 500च्या नोटा चिटकवून दिला 'अंत्यसंस्काराचा खर्च'

सगळ्यात गंभीर म्हणजे कुटुंबातील सगळ्यांनी आत्महत्या केल्यामुळे अंत्यसंस्काराचा कोणाला खर्च होऊ नये म्हणून भिंतीवर 500-500च्या नोटा चिटकवल्या आणि त्याखाली अंत्यसंस्काराच खर्च असं लिहलं आहे.

  • Share this:

गाजियाबाद(उत्तर प्रदेश), 03 डिसेंबर : काळजाचा थरकाप उडवणारा सामूहिक आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिंतीवर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. सगळ्यात गंभीर म्हणजे कुटुंबातील सगळ्यांनी आत्महत्या केल्यामुळे अंत्यसंस्काराचा कोणाला खर्च होऊ नये म्हणून भिंतीवर 500-500च्या नोटा चिटकवल्या आणि त्याखाली अंत्यसंस्काराच खर्च असं लिहलं आहे. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

व्यवसायातील तोटा आणि प्रियजनांचा विश्वासघात झाल्यानंतर कुटुंबातील प्रमुख गुलशन वासुदेव यांनी पत्नी आणि व्यावसायिकाच्या साथीदारासह पहिला मुलगा ‌ऋतिक आणि मुलगी किट्टूची हत्या केली. नंतर तिघांनीही 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळबळ व्यक्त होत आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या - ठाण्याच्या पुलावर व्यक्तीने घेतला गळफास, मृत्यूच्या दारातून असे आले परत!

आत्महत्येसाठी स्वत: च्या मेहुणाच जबाबदार...

भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे, जो मृत गुलशनचा मेहुणा असल्याचं सांगितलं जातं. राकेश वर्मा कुटुंबाच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं यात लिहिण्यात आलं आहे. स्वत: ला मृताचा भाऊ असल्याचं वर्णन करणाऱ्या हरीशने गुलशनचा मेहुणा राकेश वर्मा याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला. जीन्सच्या धंद्यात त्याचे दोन कोटींचे नुकसान झाले. ही फसवणूक फक्त राकेश वर्मा याने केली आहे असं यात लिहिण्यात आलं आहे.

Loading...

व्हायरल बातमी - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

कर्ज आणि तोटा यामुळे उचललेलं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटनुसार हे आत्महत्येचे प्रकरण आहे आणि हे स्पष्ट झाले आहे की हे कुटुंब आर्थिक संकटातून जात होते. गुलशनचे व्यवसायामध्ये तसेच कर्जामुळे बरेच नुकसान झाले. त्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

मोठी बातमी - पुणे हादरलं, घरात सापडला उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह

पाळीव सस्याची देखील केली हत्या

गुलशन, त्यांची पत्नी आणि व्यवसायातील जोडीदाराने आधी झोपलेला मुलगा हृतिक आणि मुलगी किट्टूला गळा कापून ठार केलं. यानंतर घरात जन्मलेल्या ससाचाही गळा आवळून हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर तिघांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com