S M L

काँग्रेस दहशतवाद्यांना बिर्याणी देते तर मोदींची सेना गोळ्या घातले - योगी

'काँग्रेसचे नेते मसूद अझहरला जी लावतात यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते.'

Updated On: Apr 1, 2019 10:54 PM IST

काँग्रेस दहशतवाद्यांना बिर्याणी देते तर मोदींची सेना गोळ्या घातले - योगी

गाझियाबाद 1एप्रिल : भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य दिलंय. युपीएच्या काळात काँग्रेस दहशतवाद्यांना बिर्याणी देत होते तर मोदींची सेना दहशतवाद्यांना गोळ्या घालते असं वक्तव्य योगी यांनी केलंय. गाझियाबाद इथं झालेल्या एका प्रचार सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे नेते मसूद अझहरला जी लावतात यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. योगींनी भारतीय सेनेला मोदींची सेना असं म्हटल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

या आधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही दहशतवादाच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली होती.




तर पुलवामा  घडलं नसतं

Loading...

तत्कालीन केंद्र सरकारने 10 वर्षांपूर्वीच जर दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली असती तर पुलवामा सारख्या घटना घडल्या नसत्या असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. विरोधीपक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना आमच्यासोबत

शिवसेना हा भाजपचा मित्र असून तो कायम आमच्यासोबत होता असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना आणि भाजप हे वैचारिक मित्र आहेत असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमातून जो निधी जमा होईल तो निधी शहीद सैनिक कल्याण फंडात जमा करण्यात येईल अशी घोषणाही 'न्यूज18'ने केली आहे.

नेहरुंवर टीका

पाकिस्तानात असलेला दहशतवादी मसूद अझहर याच्यावर जागतिक बंदी घालण्याच्या प्रयत्नांना चीन खिळ घालत आहे. चीनला व्हेटोचा अधिकार असल्यामुळेच चीन असा प्रयत्न करतो आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनीच भारताला मिळणारा व्हेटो अधिकार चीनला दिला असा आरोपही त्यांनी केला.



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 10:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close