गाझियाबाद, 09 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगरचे भाजपचे आमदार अजित पाल त्यागी यांचे मामा नरेश त्यागी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉरला गेले असताना अज्ञातांनी नरेश त्यागी यांच्यावर हल्ला केला. त्यागी आपल्या घराबाहेर फिरत होते, त्यादरम्यान गोळ्या मारून त्यांची हत्या करण्यात आली. येथील एसएसपी कलानिधी नैथानी यांनी घटनेची माहिती दिली आहे.
एसएसपी नैथानी यांनी सांगितले की, नरेश त्यागी पहाटे सहाच्या सुमारास घराबाहेर फिरत होते. यावेळी, स्कूटीवरून अज्ञात आले आणि त्यांनी नरेश त्यागी यांना गोळ्या घातल्या. नरेश त्यागी रस्त्यावरच पडून होते.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लोहिया नगरजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की नरेश त्यागी हे हा पेशाने कंत्राटदार होते. हत्येच्या चौकशीसाठी पोलिसांची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
गाजियाबाद के विधायक अजीत त्यागी जी के मामा नरेश त्यागी की मॉर्निंग वाक के समय गोलियों से भून कर हत्या।
— UP Congress (@INCUttarPradesh) October 9, 2020
प्रदेश भाजपा सरकार ने यूपी के जंगलराज को इतना बढ़ा दिया है कि अब अपराधी खुलेआम किसी भी समय पर अपराध कर रहे हैं।
आमदाराच्या मामावर गोळ्या झाडल्याचा प्रकार त्यागी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यात स्कुटीवरून दोन तरूणांनी गोळी चालवल्याचे दिसत आहे. कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीनं पोलीस या अज्ञातांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. भरदिवसा होणाऱ्या या अपराधांबाबत कॉंग्रेसनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे.