नवी दिल्ली, 15 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) प्रचंड वाढ झाली आहे. सायबर चोरटे सोशल मीडियावर विविध प्रकारची आमिषं दाखवून सामन्य नागरिकांची लुट (Money Fraud) करत आहेत. सरकारी योजना असल्याचं भासवून देखील नागरिकांना गंडा घातला जात आहे. असं असताना सोशल मीडियावर 'आधार कार्डवर 2 टक्के व्याजदराने कर्ज मिळवा' (get loan on adhar card) अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतं आहे. हा मेसेज काही जणांच्या मोबाइलवर देखील आला.
केंद्र सरकार आधार कार्डवर 2 टक्के व्याजाने कर्ज देत असल्याचा दावा संबंधित मेसेजमधून करण्यात येत आहे. तसेच संबंधित कर्जावर सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याचा दावा देखील या मेसेजमधून केला जात आहे. पण या व्हायरल मेसेज मागचं तथ्य काय आहे? केंद्र सरकारने अशी कोणती योजना सुरू केली आहे का? याचा खुलासा पीआयबीने केला आहे.
हेही वाचा-आधी तक्रार केली नंतर 1 लाखांची खंडणी मागितली, RTI कार्यकर्त्याला अटक
पीआयबीने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये संबंधित मेसेजमध्ये केलेला दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरू केली नसल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे अशाप्रकारचा मेसेज तुम्हालाही आला असेल तर, वेळीच सावधान व्हा, असं सल्ला पीआयबीकडून देण्यात आला आहे.
एक फर्जी मैसेज में पीएम योजना के तहत आधार कार्ड से 2% सालाना ब्याज पर लोन दिए जाना का दावा किया जा रहा है।#PIBFactcheck ➡️कृपया ऐसे फर्जी संदेशों को शेयर न करें। ➡️यह आपकी निजी जानकारी चुराने का भी प्रयास हो सकता है। pic.twitter.com/cV6eMoahYH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 6, 2021
याबाबत माहिती देणारा ट्वीट पीआयबी फॅक्ट चेक अकाउंटवरून करण्यात आलं आहे. तसेच अशा आशयाचा मेसेज फॉरवर्ड न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. अशा मेसेजवर विश्वास ठेवून दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास अथवा संपर्क साधल्यास सायबर चोरटे क्षणार्धात तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात. त्यामुळे वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी कोणत्याही व्यक्तीला शेअर न करण्याचं आवाहन पीआयबीकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news