राष्ट्रगीत सुरू असताना जर्मनीच्या चान्सलर होत्या बसून! जाणून घ्या काय आहे नियम

भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या चान्सलर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरू असताना प्रकृती अस्वास्थामुळे बसून होत्या.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 12:32 PM IST

राष्ट्रगीत सुरू असताना जर्मनीच्या चान्सलर होत्या बसून! जाणून घ्या काय आहे नियम

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल भारत दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांच्या स्वागतासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरू असताना चान्सलर मार्केल प्रकृती अस्वास्थ्यामुळे उभा राहू शकल्या नाहीत. यासाठी जर्मनीने भारताला आधी माहिती दिली होती. राष्ट्रगीत सुरू असताना बसण्यासाठी चान्सलर मार्केल यांना नियमानुसार परवानगी देण्यात आली.

भारताच्या राष्ट्रगीताबद्दल असलेल्या नियमांनुसार चान्सलर मार्केल यांना राष्ट्रगीत सुरू असताना बसण्याची सूट दिली गेली. चान्सलर मार्केल यांना कोणत्याही आधाराशिवाय जास्तवेळ उभा राहता येत नाही. याआधीही काही देशांना भेटी दिल्या तेव्हाही त्या राष्ट्रगीत सुरू असताना बसल्या होत्या.

भारतात राष्ट्रगीत सुरू असताना उभा राहण्यासाठी काही नियम आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेत गृह मंत्रालयाने मे 2017 मध्ये एक पत्र लिहलं होतं. यात कोणाला सूट देता येईल याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.

एखाद्या डॉक्युमेंट्री, फिल्म किंवा न्यूजरीलमध्ये राष्ट्रगीत वाजतं तेव्हा प्रेक्षकांकडून उभा राहण्याची अपेक्षा करता येणार नाही. काऱण यामुळे फिल्ममध्ये व्यत्यय येईल आणि राष्ट्रगीताबद्दल आदराऐवजी संभ्रमाची स्थिती निर्माण होईल. व्हील चेअर वापरणाऱ्या, ऑस्टिज्म, सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या व्यक्ती, मानसिक आजार, मूक-बधिर, पार्किन्सन, मल्टिपल सेलेरोसिस, कुष्ठरोग किंवा मस्कुलर डिस्ट्राफी झालेल्यांना राष्ट्रगीतावेळी उभा राहण्यातून सूट देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश! आजपासून होणार 'हे' बदल

सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याने बंधनकारन नसल्याचे स्पष्ट कलं आहे. आता ते चित्रपटगृहाच्या मालकांवर अवलंबून आहे की राष्ट्रगीत वाजवायचे की नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रगीतावेळी दिव्यांगाना उभा राहण्यातून सूट असेल.

वाचा : Whatsapp वरून सरकारने केली हेरगिरी, देशात खळबळ!

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...