भारताने AIR STRIKE करण्याआधी दहशतवाद्यांचा असा होता 'डे प्लॅन'

भारताच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचं दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त झालं.

  • Share this:

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केलं. बालाकोटमधील अल्फा 3 हे प्रशिक्षण केंद्र भारताच्या हवाई दलाने 1 हजार किलो बॉम्ब टाकून उडवले.

पाकिस्तानातील खैबर- पख्तूनख्वा प्रांतातील मानशेरा जिल्ह्यात बालाकोट हे शहर आहे. जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अजहर काही काळ या भागात वास्तव्याला होता.

जैश ए मोहम्मदच्या या दहशतवादी प्रशिक्षण तळावर कशा प्रकारे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं याबद्दलची माहिती भारतीय संस्थांनी पाकिस्तानला दिली आहे.

पहाटे 3 ते 5 या वेळेत या ठिकाणी सकाळची प्रार्थना व्हायची. नमाज झाल्यानंतर 8 वाजेपर्यंत दहशतवादी शारिरिक व्यायाम करायचे.

तीन तासांच्या व्यायामानंतर त्यांना तासभर वेळ नाश्ता करण्यासाठी दिला जात असे. त्यानंतर दुपारी साडेबारापर्यंत दहशतवाद्यांना वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती दिली जायची.

शस्त्रास्त्रांमध्ये एके 47, ग्रेनेड, पिका गन, पिस्तुल यांसारख्या शस्त्रांचा समावेश असायचा. हत्यारांच्या अभ्यासानंतर दुपारची प्रार्थना आणि जेवण यासाठी 3 वाजेपर्यंत वेळ दिला जात असे.

दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांना दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. कट रचताना आणि प्रत्यक्ष हल्ला करताना वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जायची.

सायंकाळी पाचनंतर वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी वेळ दिला जायचा. त्यानंतर संध्याकाळची प्रार्थना आणि जेवण झाल्यानंतर रात्रीची झोप असा दहशतवादी प्रशिक्षणार्थीचा डे प्लॅन असायचा.

ग्वाल्हेरच्या या एअरफोर्स बेसवरून मिराज 2000 ने भरारी घेतली आणि थेट पाकिस्तानच्या आबोटाबादनजिक बालाकोट इथे असलेल्या अतिरेक्यांच्या तळाचे वेध घेतले.

भारत- पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय वायुसेनेची विमानं बालाकोटला पोहोचली आणि तिथल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला.

भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी एअरस्ट्राईक्सची माहिती देताना सांगितलं की, जैशच्या दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर या भागात होती.

पाकिस्तानातल्या बालाकोटमध्ये इथे अतिरेक्यांची शस्त्रास्त्रंसुद्धा होती. त्यामध्ये 200 हून अधिक AK रायफल्स होत्या, हँड ग्रेनेड, स्फोटकं आणि दारूगोळा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मानसेहरा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदचा जुना ट्रेनिंग कँप होता. याची माहिती भारत आणि इतर देशांमध्ये अतिरेकी हल्ल्यांनंतर पुढे आली होती.

या ट्रेनिंग कँपची एक छोटी शेड, एक मशीद आणि काही बंकर असा हा तळ होता. मुझफ्फराबादपासून बालाकोट 40 किमी अंतरावर आहे.

मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या विमानांनी कुठल्या एअरबेसवरून उड्डाण केलं पाहा..

भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यातली 3 विमानं ग्वाल्हेरच्या एअरबेसवरून उडाली होती, अशी माहिती मिळते आहे.

मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या जवळ महाराजपुरा इथे वायुदलाचा तळ आहे. या एअरफोर्स बेसवरून मिराज2000 विमानांनी पाकिस्तानच्या दिशेनं उड्डाण केलं.

पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या 12 विमानांनी लक्ष्यभेदी हल्ला केला. पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्लाल्हेरच्या एअरबेसवर आले होते. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बातचीतही केली होती.

ग्वाल्हेरच्या या महाराजपूर एअरफोर्स बेसवर मिराज आणि त्यासारखीच सुखोई ही लढाऊ विमानं तैनात आहेत. हा बेस 1942 मध्ये अस्तित्वात आला आणि आतापर्यंतच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

1999 च्या कारगिल युद्धातही ग्वाल्हेरच्या याच एअरफोर्स बेसवरून लढाऊ विमानांनी उड्डाण केलं होतं.

ग्वाल्हेरचं हे एअरफोर्स स्टेशन देशातला एकमेव एअरबेस आहे, जिथून लढाऊ विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरता येतं. युद्धादरम्यान एखाद्या लढाऊ विमानाला इंधनाची कमतरता भासली तर दुसरं जेट प्लेन भरारी घेऊन इंधन पुरवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 10:01 AM IST

ताज्या बातम्या