S M L

'हा दलित समाजाचा अपमान', गेहलोत यांच्या टिकेला भाजपचं उत्तर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमधला वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेस या देशातली गरिब जनता आणि दलित समुदायाच्या विरुद्ध आहे का, असा सवाल भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी विचारला आहे.

Updated On: Apr 17, 2019 03:22 PM IST

'हा दलित समाजाचा अपमान', गेहलोत यांच्या टिकेला भाजपचं उत्तर

नवी दिल्ली, 17 एप्रिल : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमधला वाद चांगलाच पेटला आहे.

काँग्रेस या देशातली गरिब जनता आणि दलित समुदायाच्या विरुद्ध आहे का, असा सवाल भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी विचारला आहे. दलित समाजातून आलेल्या राष्ट्रपतींना काँग्रेस विरोध का करतं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत, ते ज्ञानीही आहेत. पण केवळ एका समाजाचं नाव घेऊन काँग्रेस राष्ट्रपतींबरोबरच पूर्ण समाज आणि देशाला बदनाम करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.


काय म्हणाले गेहलोत ?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जातीवरून केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका सभेमध्ये भाषण करताना एक वक्तव्य केलं.

गुजरातच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यावेळी भाजपला गुजरातमध्ये यश येणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे जातीय समीकरणं जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं आणि लालकृष्ण अडवाणींना हे पद मिळालं नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले आणि वाद पेटला.

Loading...

थेट राष्ट्रपतींवर टीका

अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या राजकारणात थेट राष्ट्रपतींनाच ओढल्यामळे या लोकसभा निवडणुकीत हा वाद चांगलाच स्फोटक बनला आहे. अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी हे वक्तव्य करून गंभीर वादाला तोंड फोडलं आहे.

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी गेहलोत यांनी तयारी चालवली आहे.

याआधी, काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुस्लीम समुदायासमोर केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. बिहारमधल्या कटिहारमध्ये सिद्धू यांनी मुस्लीम मतदारांना, मोदींना मत न देण्याचं आवाहन केलं होतं. आता गेहलोत यांनी राष्ट्रपतींच्या जातीबद्दलच वादग्रस्त विधान केलं आहे.

अडवाणींचाही उल्लेख

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अडवाणींना राष्ट्रपती केलं गेलं नाही. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीतही लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेला एक ब्लॉगही गाजला होता. जे आपल्या विरोधात आहेत त्यांना आपण राष्ट्रद्रोही म्हणू शकत नाही, अशी टिप्पणी अडवाणींनी केली होती. यावरून लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले मतभेद समोर आले.

त्यातच आता अशोक गेहलोत यांनी हे वक्तव्य करून भाजपमधल्या या वादाच्या आगीत तेल ओतलं आहे, अशी चर्चा आहे.

=================================================================================================================================================================

VIDEO : 'चोर की पत्नी', प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 03:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close