फॉरेस्ट गार्डने टिपला 3 सिंहिणींचा थरार, पाहा कधीही न पाहिलेला VIDEO

फॉरेस्ट गार्डने टिपला 3 सिंहिणींचा थरार, पाहा कधीही न पाहिलेला VIDEO

पावसाळ्यात पाणी आल्यानंतर सगळ्या प्राण्यांचा मुक्त संचार पुन्हा एकदा नदीवर होत असतो. अशा एका सायंकाळी तीन सिंहिणी नदीवर आल्या होत्या.

  • Share this:

अहमदाबाद 12 जुलै: गुजरातमधलं गीरचं अभयारण्य हे सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यातल्या नदीत आता पावसामुळे पाणीही आलं आहे. उन्हाळ्यात कोरडी पडलेली नदी आता वाहती झाल्याने प्राणीही नदीवर येत आहे. या नदीच्या पाण्यात खेळण्यासाठी आलेल्या तीन सिंहिणींचा एक व्हिडीओ पुढे  आला आहे. नदीच्या पाण्यात मुक्तपणे विहार करणाऱ्या सिंहिणी अशा पद्धतीने बघायला मिळणं हे दुर्मिळ समजलं जातं. या अभयारण्यातल्याच एका गार्डने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

गीर अभयारण्यातली रावल नदी ही इथल्या प्राण्यांसाठी सगळ्यात मोठा आधार आहे. इथल्या कडक उन्हाळ्यात याच नदीच्या पाण्यावर त्यांची गुजराण होत असते. पावसाळ्यात वाहणारी रावल नदीचं पाणी उन्हाळ्यात मात्र कमी होतं.

त्यामुळे इथल्या प्राणांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पावसाळ्यात पाणी आल्यानंतर सगळ्या प्राण्यांचा मुक्त संचार पुन्हा एकदा नदीवर होत असतो. अशा एका सायंकाळी तीन सिंहिणी नदीवर आल्या होत्या. याच भागात गस्त घालणाऱ्या फॉरेस्ट गार्डच्या नजेत हे दृश्य पडलं.

नदीच्या पाण्यात एकाचवेळी तीन सिंहिणींचं पोहणं हे त्याने आजपर्यंत पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्याने तो थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. माजी वनाधिकारी डॉ. अंशुमान शर्मा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 12, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading