मराठी बातम्या /बातम्या /देश /देशाच्या विकास दरात घट, GDP 7.1 वर घसरला

देशाच्या विकास दरात घट, GDP 7.1 वर घसरला

आर्थिक विकासाच्या बाबतील भारत अजूनही चीनच्या पुढे आहे. भारताची अर्थव्यस्था 2.3 ट्रिलियन डॉलरवर गेली असून आशियात तीसऱ्या क्रमांकांची मोठी अर्थव्यवस्था आहे.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : चालू आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या विकास दरात घट झालीय. आधीच्या 8.2 टक्क्यांवरून हा विकास दर 7.1 टक्क्यांवर आलाय. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला हा दर आहे. या आधी एप्रील ते जून या महिन्यांमध्ये GDP 8.2 टक्क्यांवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या भडकलेल्या किंमती, रूपयाचं अवमुल्यन यामुळं ही घट झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

    रेटिंग देणारी कंपनी इकरा आणि एसबीआय रिसर्च या संस्थांनीही दुसऱ्या तिमाहित विकासदरात घट होईल असा अंदाज व्यक्त केला होता. या महिन्यांमध्ये देशात पाऊस असल्याने त्याला तात्कालीक फटका शेतीच्या उत्पादनांना बसतो त्याचाही परिणाम विकास दरावर होत असतो.

    जुलै ते सप्टेंबर 2017 - 6.3 टक्के

    ऑक्टोंबर ते डिसेंबर 2017 - 7 टक्के

    जानेवारी ते मार्च 2018 - 7.7 टक्के

    एप्रील ते जून 2018 - 8.2 टक्के

    जुलै ते सप्टेंबर 2018 - 7.1 टक्के

    आर्थिक विकासाच्या बाबतील भारत अजूनही चीनच्या पुढे आहे. भारताची अर्थव्यस्था 2.3 ट्रिलियन डॉलरवर गेली असून आशियात तीसऱ्या क्रमांकांची मोठी अर्थव्यवस्था आहे. दुसऱ्या तिमाहितला GDP चा आकार 33.98 लाख कोटी असेल मागच्या वर्षी हा आकार 31.72 लाख कोटी होता.

    VIDEO: जीवाची बाजी लावत विहिरीतून सुखरूप बाहेर काढला विषारी कोब्रा

    First published:

    Tags: GDP, Groth rate, Indian ecomony, भारत, भारतीय अर्थव्यवस्था, विकासदर