चीनपेक्षाही भारताचा जीडीपी दर कमी !

चीनपेक्षाही भारताचा जीडीपी दर कमी !

जीडीपी दर तब्बल 2.2 टक्क्यांनी घसरलाय. एवढंच नाहीतर 5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय.

  • Share this:

31 आॅगस्ट : देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मोदी सरकारचा चांगलाच धक्का बसलाय. जीडीपी दर तब्बल 2.2 टक्क्यांनी घसरलाय. एवढंच नाहीतर

5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने आज गेल्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा आढावा घेतला त्यात ही बाब समोर आलीय. यापूर्वीच्या तिमाहीत हाच विकास दर 6.1टक्के होता. तर गेल्या वर्षी हाच विकास दर 7.9टक्क्यांवर पोहोचला होता. तर चीनचा वार्षिक विकास दर 6.9 टक्के इतका होता. पण नोव्हेंबरमधील नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी खीळ बसलीय. तेव्हापासून भारताच्या विकासदरात सातत्याने घट होताना दिसतेय.

जीएसटीचा परिणाम

असं म्हटलं जातंय की, आर्थिक विकास दरावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीचाही यावर परिणाम झालाय. 1 जुलैला मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत जीएसटी लागू केलं. पण जीएसटी लागू होण्याआधी व्यापाऱ्यांनी आपल्याकडील जुना माल विकत नाही तोपर्यंत नवा माल उत्पादकांकडून घेतला नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठेचं मोठं नुकसान झालं.

भारताची पीछेहाट

आर्थिक विकास दराच्या शर्यतीत भारताची पीछेहाट झालीये, मागील वर्षी चीनचा आर्थिक विकास दर हा 6.9 टक्के होता. चीनने एप्रिल-जूनपर्यंत तिमाहीमध्येही हाच दर कायम राखला. पण भारतात मात्र उलटं झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 12:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading