नवी दिल्ली, 31 मे : नरेंद्र मोदी सरकारने कामाला सुरुवात केली आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पण सरकार आल्याआल्या एक मोठा धक्का बसला आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च या काळात देशाचा GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न दर घटला असून तो 5.8 टक्क्यांवर आला आहे. हा जीडीपी गेल्या काही महिन्यांतला सगळ्यात कमी आणि चीनच्याही खाली आहे.
उत्पादनात घट
शेतीक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रातली कामगिरी खालावल्यामुळे विकासदरात घट झाली आहे, असं सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसचं म्हणणं आहे.
मागच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 7.2 टक्के होता. हा दर खालावून 2018-19 मध्ये 6.8 वर आला आहे.
2014-2015 या आर्थिक वर्षानंतर GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर इतका खाली आहे. 2013-14 या वर्षांत एकदा हा दर 6.4 इतका होता.
शेतीक्षेत्रातही आव्हान
मोदी सरकारसमोर हा GDP वाढवण्याचं आव्हान आहे. त्याचबरोबर बेरोजगारी घटवणं आणि औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठीही या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.
निर्मला सीतारामन यांच्यावर मोठी जबाबदारी
नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान मिळालेल्या निर्मला सीतारामन यांना रेकॉर्डब्रेक कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
अर्थमंत्री मॉन्सून
मॉन्सून हा भारताचा अर्थमंत्रीच आहे, असं म्हणतात. यावेळी समाधानकारक पाऊस पडला तर शेतीचं उत्पादन वाढू शकतं. त्यामुळेच आता सगळ्यांचीच मदार पावसावर आहे. यावेळी सरासरी 96 टक्के पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता तरी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
===============================================================================
VIDEO : कोयत्याने सपासप वार, राष्ट्रीय महामार्गावर तरुणाची हत्या