370 कलम हटविण्याला 1 वर्ष पूर्ण झालं त्याच दिवस जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचा राजीनामा

370 कलम हटविण्याला 1 वर्ष पूर्ण झालं त्याच दिवस जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचा राजीनामा

मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात.

  • Share this:

श्रीनगर, 5 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी आज राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. मात्र राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. 2019 मध्ये ऑक्टोबरनंतर मुर्मू यांना जम्मू-काश्मिरीच्या उपराज्यपालपदी नियुक्त करण्यात आले होते. आज सकाळी नॉर्दन कमांडचे आर्मी कमांडर यांनी मुर्मू यांना बोलावून युनिअर टेरिटरीच्या सुरक्षेबाबत चर्चा केली.

सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मिरच्या नायब राज्यपालपदाची शपथ 2019 मध्ये घेतली. जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल बनणारे मुर्मू हे 1985 च्या तुकडीतील गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी आहेत. शिवाय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मुर्मू हे त्यांचे प्रमुख सचिव राहिलेले आहेत. पूर्वी ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते.

आज जम्मू-काश्मिरातील 370 कलम हटविण्याला 1 वर्ष पूर्ण झाले आहे.

हे वाचा-‘ते एकत्र येऊन आनंद साजरा करीत आहेत’; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप

यानिमित्ताने काश्मिरमध्ये अनेक भागात आनंद साजरा केला जात आहे. याबाबत ओमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केल्याचे ट्विट सोशल मीडियावर केले होते. त्याच दिवशी मुर्मू यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुर्मू काश्मिरातील सुरक्षाबाबत अधिक सजग होते. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केलं होतं. त्यांनी राजीनामा का दिला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: August 5, 2020, 10:57 PM IST

ताज्या बातम्या