Job Alert- भारतीय सेनेत नोकरीची संधी, असं करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Job Alert- भारतीय सेनेत नोकरीची संधी, असं करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

लष्कर भरतीचे डिरेक्टर कर्नल विक्रम सैनी म्हणाले की, १ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ही भरती होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०१८- जर तुम्हालाही सेनेत जाण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत बिहारच्या गया येथून सटे बोधगया स्थित बीएमपी- ३ च्या मैदानात भारतीय सेनेच्या भरतीसाठी खुल्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेत १३ दिवस मुलांना सेनेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात भरती करण्यात येणार आहे.

यासंबंधी लष्कर भरतीचे डिरेक्टर कर्नल विक्रम सैनी म्हणाले की, १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ही भरती होणार आहे. यात सेनेच्या भरती कार्यालय गयाच्या अंतर्गत येणारे औरंगाबाद, गया, जमुई, जहानाबाद, कैमुर, लखीसराय, नालंदा, नवादा, रोहतास आणि शेखपुरा या ११ जिल्ह्यात शिकणारे विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतात. त्यांनी हेही सांगितलं की, सर्व विद्यार्थ्यांनी २६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१८ आहे. सर्व जिल्ह्यांना श्रेणीनुसार, सविस्तर कार्यक्रम ३ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान प्रकाशित करण्यात येईल. त्याचबरोबर बर्तीची तारीखही त्या प्रवेश पत्रात नमुद करण्यात येईल. सैनी यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिली की, आपल्या जिल्ह्यातील रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि शक्यतो एक दिवस आधीच तिथे उपस्थित रहावे.

सैनी पुढे म्हणाले की, कोणत्याही प्रक्रियेसाठी पैसे खर्च करु नका. कारण ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच असून यात कोणीही कोणत्याही पद्धतीची मदत करू शकत नाही. तुमचं शारीरिक स्वास्थ आणि योग्यतेवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीवर सेनेत भरती व्हा.

#MustWatch: तुम्ही पाहिलेच पाहिजेत असे धक्कादायक 5 व्हिडिओ

First published: November 29, 2018, 5:51 PM IST

ताज्या बातम्या